💥शिवसेनेसोबत गद्दारी केली त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही, सेना आमदाराचा बंडखोरांना इशारा...!


💥जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आमदार संतोष बांगर यांचे जोरदार स्वागत💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत. या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र शिवसेनेसोबतच राहणे पसंत करणार

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर' उद्धव साहेब माफ करतील' बांगर यांचे बंडखोरांना आवाहन छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू न देण्याचीही विनंती


 
हिंगोली : शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत बंडाळी सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडे किती निष्ठावंत आमदार राहतात याबाबत तर्कवितर्क लावले जाऊ लागले होते. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मातोश्रीची साथ सोडलीच नाही. या परिस्थितीतही ते कायम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यांच्या या निर्णयाचे हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा एक गट आधी सूरत व नंतर गुवाहटीत गेल्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर संकटाचे ढग आहेत. या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र शिवसेनेसोबतच राहणे पसंत केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच नेतृत्व मान्य केले. मात्र या घडामोडी घडत असताना त्यांनी मुंबई सोडली नव्हती.


'उद्धव साहेब माफ करतील'

संतोष बांगर हे मुंबईहून शुक्रवारी सकाळी हिंगोलीत परतले. येथे त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी बंडखोर आमदारांना परतीचे आवाहन करताना त्यांना रडू कोसळले. "तुम्ही काही दिवसापासून बघत आहात, वातावरण अतिशय वाईट आहे. त्या सर्व आमदारांना माझी कळकळीची विनंती आहे. ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत."

'भगवा आबाद ठेवा'

छत्रपती शिवरायांचा जो भगवा बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर दिलाय, तो आबाद ठेवण्याचे काम सर्वांनी करावं. हीच कळकळीची विनंती तुम्हाला करतो. मला आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांनाही विनंती करायची आहे, तुम्ही सगळे एकत्र या तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. फक्त एकच काम करा, छत्रपतींच्या भगव्याला डाग लावू देऊ नका."

'शिवसैनिक पक्षासोबतच आहे'

ते पुढे म्हणाले की,"मी निवडून आल्यावर जेवढा सत्कार, सन्मान झाला नव्हता, तेवढा आज झाला. त्यामुळे आमदार कुठेही गेले तर शिवसैनिक ठामपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. अंगावरचा भगवा हटला तर आम्ही काहीच नाही. कितीही ऑफर आल्या तरीही बळी पडणार नाही. माझ्यासारखा किराणा दुकान चालविणारा माणूस आज आमदार झाला, हेच शिवसेनेच मोठेपण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा हळव्या मनाचा माणूस आहे. ते वर्षा बंगला सोडत होते, तर लोक रडताना मी पाहिले. त्यामुळे या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे साकडे मी विठ्ठलाला घालत आहे", असेही ते म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या