💥इंडेन कंपनीचे १० ते ५ किलोचे कंपोझिट गॅस सिलेंडरची बाजारात एन्ट्री...!

 


💥चिखलीत रामदेव इंडेनमध्ये उपलब्ध - शैलेश बाहेती 

✍️ मोहन चौकेकर

चिखली :- गॅस कंपन्याही काळानुसार बदलू लागल्या आहेत. कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलेंडरमध्येही बदल करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुख्य बदल या सिलेंडरच्या वजनात होतो आहे. सामान्य गॅस सिलेंडर व्यतिरिक्त आता इंडेन कंपनीने  कंपोझिट गॅस सिलेंडर बाजारात आणले आहेत.वजनाने कमी असलेला  कंपोझिट गॅस सिलेंडर हा रामदेव इंडेन येथे उपलब्ध आहे. 

चिखली मध्ये १० किलोच्या सिलेंडरची किंमत ७३१ रुपये आहे. देशभरातील विविध शहरात या गॅस सिलेंडरची किंमत वेगवेगळी आहे. सदर सिलेंडरचे वितरण २३ जूनला ग्राहकांना करण्यात आले. यावेळी रामदेव इंडेनचे संचालक मा .शैलेश बाहेती यांनी सांगितले कि , कंपोझिट गॅस सिलिंडर १०  किलो व ५ किलो  मध्ये उपलब्ध असून  हे दोन्ही गॅस सिलिंडर चिखलीत रामदेव इंडेनमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले  व लवकरच गरिब व गरजु लोकांसाठी २ किलोमध्ये देखील  गॅस सिलिंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली .   संमिश्र गॅस सिलेंडर पारदर्शक आहे. त्याचे वजन कमी असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे जाते. ज्या घरामध्ये गॅस कमी वापरला जातो, त्यांच्यासाठी हा पर्याय उपयुक्त आहे.

आग लागण्याचा किंवा गळतीचा धोका तर नाही, नवीन  कंपोझिट सिलिंडर अत्यंत सुरक्षित तर आहेच, पण त्याची अनोखी रचना तुमच्या स्वयंपाकघराचे सौंदर्य देखील वाढवेल.याप्रसंगी अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक व  मान्यवर उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या