💥पाथरा येथील मुस्लीम कब्रस्तान मध्ये साचणारे पाणी तात्काळ काढा अन्यथा...!


💥अंतविधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जागा उपलब्ध करून द्या : प्रहार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी - परभणी तालुक्यातील पाथरा येथे असलेल्या मुस्लीम धर्मीय कब्रस्तानमध्ये रस्त्यालगतच्या नाल्याचे पाणी साचत असल्याने कब्रस्थान मध्ये अंतविधी करण्यात आलेल्या मृतदेहाची हेटाळणी होत असून गांवामध्ये एखादा व्यक्ती मयत झाल्यास कब्रस्तान मध्ये पाणी साचल्याने अंतविधी करणे शक्य होत नाही. जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालय व ग्राम पंचायत पाथरा यांना वेळोवेळी विनंती करूनही रस्त्या लगतचे पाणी काढण्यासाठी नाली काढली जात नाही या बाबत पाथरा येथील गावकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार करून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली या मागणी ची तत्काळ दाखल घेऊन  आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व पाथरा गावाच्या नागरिकांसह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व पाथरा येथील कब्रस्थान चा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली.

 मागील १५ वर्षापासून ही अडचण असल्याने अंतविधी करणे अवघड होत आहे. स्मशानभुमी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे या विषयावर तात्काळ लक्ष घालून परभणी तालुक्यातील पाथरा येथील मुस्लीम धर्मीय कब्रस्तान मध्ये साचणारे पाणी रस्त्या लागतचा नाला साफ करून काढून दयावे जर प्रशासनाने या बाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास भविष्यात पाथरा येथे मृत पावणाऱ्या व्यक्तीचे पाथरा येथील कब्रस्तानमध्ये दफन करणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृतदेह दफण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दयावी व यावेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्ना बाबत जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख सय्यद मुस्तफा, शहर चिटणीस वैभव संघई, शेख अमजत, शेख हुसेन, सय्यद युनूस, बागवान सिद्दीकी, सय्यद मजर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या