💥उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद...!


💥रस्ता खुला करण्यासाठी शेतकऱ्यांचे उपविभागीय कार्यालयापुढे गुरे-ढोरे व कुटुंबासह अमरण उपोषण💥 

परळी (प्रतिनीधी)

 परळी शिवारातील शेतकऱ्यांना वहिती करण्यासाठी असलेला पुर्वापार रस्ता दोन शेतकऱ्यांनी अडवलेला रस्ता मोकळा करुन देण्याचे आदेश तहसिलदारांनी दिल्यानंतर यास उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी स्थगिती दिली.खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना चाटे यांनी या रस्त्याबाबत निर्णय न घेतल्याने शेतकर्यांची वहिवाट बंद आहे.याबाबत दि.6 जुन पासुन उपविभागीय कार्यालयापुढे गुरे-ढोरे व कुटुंबासह अमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.



परळी शिवारातील सर्व्हे नं.224,249,246,244 मधुन शेतकर्यांच्या शेताकडे जाण्यासाठी असलेला पुर्वापार रस्ता रंजीत रामराव घोळवे व सिराजोद्दीन गौस यांनी अडविल्यामुळे सदरील शेतकर्यांना वहितीसाठी शेतात जाण्या येण्यास पर्यायी रस्ता नसल्याने अडचणी निर्माण झाल्याने रस्ता खुला करुन द्यावा यासाठी संतोष आदोडे,प्रकाश जुनाळ,सुरेश जुनाळ,मोहम्मद हकीमोद्दीन भास्कर ज्ञानोबा रोडे,जगन्नाथ चव्हाण,आश्रुबा पवार,भगवान पवार,अमोल रोडे या शेतकर्यांनी दि.28 एप्रिल रोजी तहसिल कार्यालयापुढे अमरण उपोषण केल्यानंतर दि.9 मे रोजी तहसिलदार परळी यांनी रस्ता खुला करण्यासंदर्भात मंडळ अधिकारी व तलाठी यांना आदेश दिल्यानंतर दि.24 मे रोजी रस्ता खुला करण्यासंदर्भात शेतकर्यांना नोटीसा दिल्या होत्या.याप्रमाणे सर्व शेतकरी जायमोक्यावर हजर झाल्यानंतरही मंडळ अधिकारी व तलाठी न येता याबाबत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी दि.1 जुन पर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले.याप्रकरणात एकतर्फी निकाल देण्यात येवु नये यासाठी शेतकर्यांनी कॅव्हेट दाखल केलेले असताना स्थगितीच्या कसल्याही सुचना न देता नम्रता चाटे यांनी स्थगिती दिली.गट नंबर व सर्व्हे नंबर बांधावरुन शेतकर्यांना वहितीसाठी रस्ते मोकळे करुन देण्याचे शासनाचे धोरण असताना परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी मात्र अडविलेल्या रस्त्याबाबत निर्णय घेता प्रश्न रेंगाळत ठेवल्याने शेतकर्यांना ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर आपल्याच शेतात जाता येत नाही.सदरील रस्ता त्वरीत मोकळा करुन द्यावा यासाठी दि.6 जुन पासुन उपविभागीय कार्यालयापुढे गुरे-ढोरे व कुटुंबासह अमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष आदोडे,प्रकाश जुनाळ,नारायण देशमुख,सुरेश जुनाळ,मोहम्मद हकीमोद्दीन,भास्कर ज्ञानोबा रोडे,जगन्नाथ चव्हाण,आश्रुबा पवार,भगवान पवार,अमोल रोडे आदींनी दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या