💥धोतरा येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी करावी यावर मार्गदर्शन...!


💥यावेळी कृषी उपसंचालक धेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

कृषी विभागामार्फत 25 जून ते 1 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज मौजे धोतरा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजनेअंतर्गत बीबीएफ व टोकन पध्दतीने पेरणी केलेल्या सोयाबीनची  व पोकरा फळबाग लागवडीची पाहणी करण्यात आली.सदरच्या कार्यक्रमात पोकरा फळबाग लागवड,साग बांबू लागवड, सोयाबीन बिजप्रक्रिया, रासायनिक खतांचा 10% वापर कमी करणे,महाडिबीटी योजने विषयी मार्गदर्शन करण्यात आले.


सदरच्या कार्यक्रमाला..उपस्थितीत कृषी उपसंचालक धेंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी लाडके, तालुका कृषी अधिकारी वळकुंडे मंडळ कृषी अधिकारी पायघन,कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भालेराव ,कृषि पर्यवेक्षक राऊत कृषी सहायक सुर्यवंशी,सुरवसे, शिंदे..गट समूह सहाय्यक नाना दराडे कुषीमित्र राम थिटे व इतर शेतकरी उपस्थितीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या