💥आम आदमी पार्टीच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आज सोमवारी नियुक्तीपत्र देण्यात आले💥
प्रतिनिधी
परभणी लोकसभेची 2019 ची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा अनुभव असलेले, सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर यांनी नुकताच आम आदमी पार्टीत प्रवेश केला. त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सोमवारी परभणी जिल्हाध्यक्षांनी दिले.
परभणी येथे आम आदमी पार्टीच्या जिल्हा संपर्क कार्यालयात सोमवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. आठ दिवसापूर्वीच सेलु येथे पार पडलेल्या आम आदमी पार्टीच्या जिल्हास्तरीय बैठकीतच मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांच्या उपस्थितीत सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. आज सोमवारी जिल्हाध्यक्ष परमेश्वर यादव, जिल्हा सचिव एडवोकेट एस बी चौधरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 17 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना मतानुक्रमे सहाव्या क्रमांकाची मते मिळवणारे सखाराम बोबडे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केल्याने पक्षाची ताकतही नक्कीच वाढणार आहे....
0 टिप्पण्या