💥पुर्णा तालुक्यातील यशवंतग्राम कावलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक...!


💥यावेळी सरपंच नारायण पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती💥


पूर्णा (दि.१२ जुन २०२२) - तालुक्यातील कावलगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली, यावेळी सरपंच नारायण पिसाळ,युवा नेते संतोष राव कौंटकर, चंद्रकांत वाघमारे,रामभाऊ वानकार, प्रकाश पिसाळ,शिवाजी पिसाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची शुभ्र अश्वावरून वाजतगाजत मिरवणूककाढण्यात आली,यावेळी बँड च्या तालावर असंख्य युवकांनी ताल धरला होता,मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या