💥महाराष्ट्र राज्यासह देशात ईडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे - दिपक केदार


💥राज्याचं बंड पहिल्यांदा देशभर दिसतय : केवळ अग्निपथ योजनेविरोधात उभा राहत असलेल आंदोलन रोखण्यात आलं💥

ईडी चा धाक दाखवुन हिंदुत्वाचा मुद्दा निर्माण केला जातोय. एकनाथ शिंदे बंड ईडीला घाबरून आहे. हिंदुत्व हे केवळ राजकीय सत्तेसाठीच खुळखूळ झालं आहे. नातेवाईक, जेलमधील नेते, जेलमध्ये जाण्या पासुन वाचण्याचा मार्ग म्हणजे गुवाहाटी आहे. हिंदुत्व हे केवळ नाटक आहे. एकनाथ शिंदे मुळे 'अग्निपथ योजना' नुपुर शर्मा मुद्ध्याला बगल दिली गेली. राज्याचं बंड पहिल्यांदा देशभर दिसतय केवळ अग्निपथ योजनेविरोधात उभा राहत असलेल आंदोलन रोखण्यात आलं.

हिंदुत्ववादी सत्तेला आम्ही रोखणार आहोत. त्याविरोधात संघर्ष केला जाईल. प्रश्न हाही आहे की वर्षा बंगल्यावर बैठक झाली की आमदार गुवाहाटी झाडी- डोंगार- हॉटेल बघायला जातात कसे? शिवसेनेला जायचयं, नौटंकी सुरू आहे ती मोठे मंत्री पद पदरात पाडण्यासाठी आहे. महाराष्ट्र उद्धवस्त अवस्थेत आहे. शेतकरी, मजुर, दलीत, उद्योजक सर्व समूह वेठीस धरला गेला आहे. हा सत्तेचा खेळ थांबला नाही तर ऑल इंडिया पर सेना रस्त्यावर उतरणार आहे.

एकनाथ शिंदेच्या माध्यमातुन उभा राहत असलेली हिंदुत्वावादी सत्ता हि लोकशाही, संविधानाला चॅलेंज करणारी आहे. त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निळे रुमाल गळ्यात टाकून एकनाथ शिंदे गटाचे रक्षण करायला सेक्युरिटी च्या भूमिकेत येऊ नये. भाजपने आमचा वापर थांबवावा. आम्ही सालगडी-बलुतेदारी कधीच सोडलेली आहे. आमचा वापर होऊ देणार नाही. 

एकनाथ शिंदे कर्मठ गट आहे. जातीयवादी गट आहे, वेळ आल्यास मनसेत विलीन होतील पण रिपाई आठवले गटात विलीन होणार नाहीत, आठवले साहेबांना ते दलित म्हणूनच बघतात नरेंद्र मोदी जर्मनीत जाऊन मन की बात करतात. लोकशाहीच्या गप्पा मारतात. भारतात मात्र नुपुर शर्माला सुरक्षा आग्निवीर सारखी देशविरोधी योजना  राबवून हुकुमशाही बळावर सत्ता चालवतात. शेतकरी चिरडून मारले गेले मोदी अद्याप बोलले नाही.  त्यांच्या बोलीत लोकशाही, कृतीत हुकूमशाही आहे. नुपुर शर्मा अद्याप अटक  नाही.

शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राट पद्धत ही नोकरशाहीत  हिंदुत्ववादी धर्मिकिकरण करण्याचा डाव आहे. सैन्यात कंत्राट हे, सैन्याच धर्मिकिकरण करण्याचे धोरण सुरू आहे.  आरएसएसच्या हिंदु राष्ट्र संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी कंत्राट बेसवर चार वर्षासाठी अग्निविर योजना आणलेली दिसते.

महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा परिषद शाळेत  कंत्राट वर शिक्षक भरती होणार आहे. एसटी महामंडळात प्रशिक्षण पूर्ण झालेले पाच हजार तरुण असतांना नव्याने कंत्राट पद्धतीवर भरती काढली आहे. कंत्राट पद्धत ही कामगार हक्कांना, कामगारांना गुलाम करणारे धोरण आहे.

भिमाकोरेगाव दंगलीतील 35000 हजार भिमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केलेत ते तत्काळ मागे घ्यावेत, स्वतंत्र बजेटचा कायदा झाला पाहिजे, रमाई घरकूलला 10 लाख रुपये घर योजना आणली पाहिजे, बुद्ध लेण्यांवरील अतिक्रमण रोखले पाहिजे,  गायरान जमिनी नावावर झाला पाहिजेत, या मागण्यांसाठी ऑल इंडिया पँथर सेना राज्यव्यापी मोर्चा काढणार आहे.

धुळे शहरात डॉ बाबासाहब आंबेडकर पुतळ्या जवळ विनोद वाईने शॉप आहे. वेळीवेळी मागणी करून हे वाईन शॉप हटवले जात नाही. आता आम्ही वाट पाहणार नाही, या आठ दिवसात या वाईन शॉपला हटवण्यासाठी, महामानवाची विटंबना रोखण्यासाठी धुळे शहरात मोर्चा काढणार आहेत. आजच्या बैठकीत ही भुमिका घेण्यात आली.

भाजप सन्माननीय रामदास आठवलेकडे दलीत चष्म्यातूनच बघते : मनसे चालते मग रिपाइं का चालत नाही ?

आज एकनाथ शिंदेपुढे मनसे पर्याय वाटतो पण रीपाई(ए) पर्याय वाटत नाहीं . भाजप जर खरचं बहुजनांचा पक्ष आहे म्हणतो तर त्यांनी एकनाथ शिंदे गटाला रिपाई आठवले गटात विलीन करायला लावून सन्मा. रामदास आठवलेंना मुख्यमंत्री करावे, भाजप अस करणारं नाही, कारण ती जातीयवादी आहे.

बुद्ध तत्वच मानवतेच तत्व आहे. हिंदुत्वाच्या गप्पा राजकीय सत्तेसाठी आहेत. बुद्ध धम्मगुरू दलाई लामांने आसाम पूरग्रस्तांना १० लाख रुपाये दिले. हिंदुत्व म्हणणारे आमदार आसाम मध्ये बसून करोडाच्या डील करतात माणसं बुडत असताना मरत असताना "काय झाडी - काय डोंगार - काय होटील" म्हणतात आणि देशात महाराष्ट्राचं हसू होत आहे. 


- दिपक केदार

राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना 

#AllindiaPantherSena

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या