💥पुर्णा पंचायत समितीतील बेजवाबदार अधिकाऱ्यां विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे गांधी वादी पद्धतीने अनोखे आंदोलन...!


💥कार्यालयात अनुउपस्थित अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्याना हार घालून केला निषेध💥

पुर्णा (दि.०८ जुन २०२२) - येथील पंचायत समिती कार्यालयात अनेक अधिकारी/कर्मचारी कार्यालयीन कामावर गैरहजर असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच सदरील बाबीची तात्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बुधवार दि.०८ जुन २०२२ रोजी थेट पंचायत समिती कार्यालय गाठून पंचायत समिती कार्यालयातील सत्य परिस्थिती पडताळून पाहिली असता कार्यालयात बरेचसे अधिकारी/कर्मचारी गैरहजर असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनात आले.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असेलेलं रोजगार हमी योजनेच्या कार्यालया तील कर्मचारी गैरहजर होते त्यावेळी त्यांचे रजेचे अर्ज तपासले असता रजेचे अर्ज आढळून न आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने अश्या बेजवाबदार अकार्यक्षम अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्च्याना हार घालून त्यांच्या बेजवाबदार वृत्तीचा निषेध केला.


यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने एक निवेदन दिले या नंतर जर कर्मचारी गैरहजर राहत असतील तर प्रहार कार्यालयाला टाळे लावून टाळाठोको आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे गटविकास अधिकारी सुनीता वानखेडे यांची कार्यालयातील अधिकाऱ्यांवर वचक नसून अनेक अधिकारी हे दौऱ्याच्या नावाखाली ऑफिस मधून गायब असल्याचे दिसून आले.. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण करून संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. 

 याबाबतची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पंचायत समिती प्रशासनास देण्यात आली असून याप्रसंगी प्रहार तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के युवा तालुका प्रमुख नरेश जोगदंड शहर प्रमुख संजय वाघमारे. नितीन कदम. मंचक कुऱ्हे, नागेश जोगदंड आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या