💥बुलडाणा जिल्ह्याच्या पृथ्वीराज पिडीयार याने योगामध्ये केला विश्वविक्रम....!


💥पृथ्वीराज पिडीयार याने बुलडाणा जिल्हाच्या लौकिकात घातली भर💥

✍️ मोहन चौकेकर

बुलढाणा : त्याच नाव पृथ्वीराज....त्याने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली...योग क्षेत्रामध्ये नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करून बुलडाणा जिल्ह्याचे नाव जगभरात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविलेल्या आणि बुलडाणा जिल्ह्याच्या पहिल्या योग विश्वविक्रमविर पृथ्वीराज यांनी बद्धपदमासन या कठीण आसन मध्ये सलग 42 मिनिट राहून योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा  तुरा रोवला आहे. 

नाशिक मधील श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या पृथ्वीराज गजानन पिडीयार या विद्यार्थ्याने अखिल भारतीय योग महासंघ आयोजित योगा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इव्हेंट 20 मार्च 2021 रोजी संपन्न झाला त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये पृथ्वीराज ने बद्ध पदमासन (LOCKED LOTUS YOGA POSE) या कठीण आसानामध्ये सलग 42 मिनिट स्थिर राहून जागतिक विश्व विक्रम आपल्या नावावर केला आहे..

अखिल भारतीय योग महासंघ प्रमुख  राजेशजी भारद्वाज याच्या मार्फत त्यांना योगा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जागतिक विक्रम चे विशेष प्रमाणपत्र ,सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात आले पृथ्वीराज यांनी या यशाचे श्रेय त्यांचे काका श्री योगाचार्य दिलीप पिडीयार सरांना ,कुटुंबाला ,गुरुजन वर्गांना व आपल्या हितचिंतकांना दिले आहे.

पृथ्वीराज हे आयुर्वेद बी.ए. एम.एस. चे विद्यार्थी असून आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक सुध्दा आहे व चिखली तालुक्यातील रहवासी आहे . त्याच बरोबर ते गावागावात जाऊन निःशुल्क योग व आयुर्वेद चा प्रचार करतात व निरोगी जीवनासाठी योगसत्र घेतात त्यांनी केलेल्या या विक्रमासाठी त्याचे सर्वच स्थरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे .                                              

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या