💥शेतकऱ्याच्या गाईची किंमत अंदाजे 55 हजार रुपये असल्याचे समजते💥
* शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली जिल्हात गेल्या तीन दिवसा पासून वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस पडत आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तपोवन येथे आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला या विज पडून एक गिर गाय दगवली आहे शेतातील गोठ्याच्या समोरा झाडाला बांधलेली गिर गाय विज पडून दगावली आहे या गाईची किंमत अंदाजे 55 हजार रुपये किंमती हि गाय होती महादेव भिमराव मते या शेतकऱ्यांची गिर गाय विज पडून दगावली त्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसा पासून वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे मात्र वादळी वाऱ्यामुळे वसमत तालुक्यातील गिरगाव कुरुंदा सह परिसरातील सुमारे 200 हेक्टर वरील केळीच्या बागा पूर्ण आडव्या पडल्या आहेत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी यांनी कृषी मंत्री दादाभूसे यांच्या कडे केली आहे....
0 टिप्पण्या