💥राज्यसभा सदस्या खा.फौजीया खान यांनी सुध्दा दिले रेल्वे प्रश्नावर राज्यसभेत आवाज उठवण्याचे आश्वासन💥
पूर्णा (दि.११ जुन २०२२) -संपूर्ण मराठवाड्यात रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा येथील रेल्वे प्रश्न व मराठवाड्यातील रेल्वे संदर्भातील समस्या बाबत आज शनिवार दि.११ जुन २०२२ रोजी रेल्वे संघर्ष समितीचे जेष्ठ नेते तथा मागील दोन दशकापासून रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने संघर्षरत असलेले संघर्ष योध्दा श्री.ओंकारसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील समितीने खासदार फौजीया खान यांना पूर्णा रेल्वे स्थानकावर शिष्टमंडळाने पुर्णेतील रेल्वे प्रश्ना संदर्भात निवेदन देऊन रेल्वे प्रश्नाबाबत चर्चा केली.
यावेळी खा.फौजीया खान यांनी राज्य सभेत रेल्वे प्रश्न मांडल्या बद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करुण सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी रेल्वे प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले दरम्यान आज शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकांम मंत्री अशोक चव्हाण यांची देखील रेल्वे संघर्ष समितीने भेट घेऊन तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा बाबत चर्चा केली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन भविष्यात लक्ष देण्याचे मान्य केले यावेळी रेल्वे संघर्षसमीती संयोजक ओकांरसिह ठाकुर ,राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाचे बापुराव घाटोळ,अॕड एम. ए .सईद ,एम जे पांचाळ, सतिश टाकळकर, काळबांडे ,पंकज ठाकुर अदि उपस्थित होते....
0 टिप्पण्या