💥पाथरी तालुक्यात खरीप पेरणीच्या अंतिम कामांची लगबग.....!


💥अन्नदाता शेतकरी लागला कामाला ; बि-बियान/खतांची जुडवाजूडव💥

किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.११ जुन २०२२) :- सलग चार पाच वर्ष दुष्काळ सोसलेल्या पाथरी तालुक्यातील शेतक-यांना २०१९ पासुन मात्र वरुनराजाने चांगली कृपादृष्टी दाखवली. यात कधी कमी तर कधी अती पाऊस झाल्याने बळीराजाचे नुकसान झालेच म्हणा पण पाणी उपलब्ध राहिल्याने थोड्या फार प्रमाणात खरीपाचे नुकसान रब्बीत भरुन निघाले. पण पैका मात्र शिल्लक राहिला नाही. आता या वर्षी तरी चांगले पिक येईल या भावनेतून परत एकदा बळीराजा शेतशिवारात खरीपाच्या पेरनी साठी शेतशिवारात कामात मग्न असल्याचे चित्र पाथरी तालुक्यात पहावयास मिळत आहे.

गेली तीन वर्षा पासुन वरुनराजाची पाथरी ताल्यात जरा जास्तच मेहरबानी झालेली दिसते. दुष्काळाचा खंड भरुन काढण्याचा काहिसा प्रयत्न वरुनराजा करताना दिसतोय. खरीपातील मुख्यपीक कापुस आणि सोयाबीन अती पावसा मुळे सखल भागातील हातचे गेले. जे आले ते अर्ध्यालाही कमी. पण गतवर्षी सोयाबीन चे दर आणि यावर्षी कापुस सोयाबीन ला ब-या पैकी दर मिळाल्याने शेतकरी राजाला थोडासा दिलासा मिळाला. आता किमान असेच दर टिकून राहावेत आणि या वर्षी पिकांना पोषक असे पर्जन्यमान व्हावे हीच अपेक्षा बळीराजा ठेऊन आहे. तीन वर्षा पासून चांगले पाऊसमान झाल्याने जायकवाडी धरण सलग तीन वर्ष शंभरटक्के भरले हे पाणी शेतीला मिळाले. परिणामी जमिनितील पाणी पातळी वाढली याचा फायदा घेत आणि परिसरात सहा साखर कारखाने असल्याने अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळले. मात्र यात ही नेमके मना वेगळे घडले.ऊस कारखाण्याला गेले खरे पण यंत्रनेने ऊस उत्पादकांना अक्षरश:लुटले यात उस उत्पादक शेतकरी नागावल्या गेला येथे ही हजारो शेतकरी नुकसानीत आले. अजूनही अनेकांचे उस शेतात उभे असल्याचे सांगितले जाते. ऊसा पासुन एकरकमी पैसा मिळतो. नवजुन करता येईल ही भावना शेतक-यांच्या मनात असते. पण यंत्रनेने येथेही शेतक-यांना त्रास देत नागवे केले. फेब्रुवारी,मार्च, एप्रिल,आणि मे महिण्यात खिशातून पैसा खर्चून ऊस पिक शेता बाहेर काढले अनेकांनी आता ऊस नको म्हणत ऊसाच्या शेतात नांगर फिरवला. आता या शेताची साफसफाई करून खरीपातील तुर,मुग,कापुस,सोयाबीन अशी पिके घेण्या साठी पुन्हा बळीराजा तयारी करतोय. अनेकांची कामे आटोपली असली तरी ज्यांचे ऊस उशिराने गेले त्यांची कामे अंतिम टप्यात असल्याचे चित्र पाथरी तालुक्यात पहावयास मिळत आहेत.ट्रॅक्टरचा पर्याय असल्याने शेतजमिनी तयार करण्यास वेळ लागत नसला तरी ट्रॅक्टर मालकाला ही पाणी लावावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वर्षी कापुस,सोयाबीन ही पिके चांगली येतील असे भेंडवळ भविष्यवानी आणि तज्ञ सांगत असल्याने कापुस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची समसमान पेरणी होईल असे चित्र सद्या तरी दिसत आहे. या वर्षी कापुस बाराहजारावर दर मिळाल्याने या हंगामात ही हमीभावा पेक्षा जास्तिचा दर मिळेल आणि सोयाबीन लाही हमी भावा पेक्षा जास्तीचे दर असल्याने हेच दर कायम राहातील या अपेक्षेवर या दोन नगदी पिकां कडे शेतकरी वळलेला दिसत आहे. मागिल तीन वर्षात सप्टेबर अॉक्टोबर मध्ये अती पाऊस झाल्याने सोयाबीन,कापसाचे मोठे नुकसान झाले होते. कापुस पुर्व हंगामी केला तर तो नेमका याच महिण्यात वेचनीला येतो. म्हणून या वर्षी बहुतांशी शेतक-यांनी ऊन्हाळी कापुस केला नाही. बियानेही उपलब्ध झाले नाही. आता मात्र उपलब्ध पाण्याचा वापर करत शेतकरी कपाशीची लागवड करतांना दिसत आहेत तर काही शेतकरी कपाशी लागवडी साठीच्या पुर्व मशागतीत मग्न झालेले दिसत आहेत एकुनच या हंगामात तरी पदरी चार पैक पडतीय या भाबड्या आशेवर शेतशिवारात अंतिम कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या