💥आनंद नगर,अमृत नगर व आदर्श कॉलोनी या भागासाठी स्वतंत्र जलकुंभासह जलवाहिनी टाकून कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटवा💥
💥मनसेकडून नगर परिषदे समोर धरणे आंदोलनाला सुरूवात💥
पुर्णा (दि.२१ जुन २०२२) - शहरातील आनंद नगर,अमृत नगर व आदर्श कॉलोनीसह बोर्डीकर प्लाटींग या उच्चभ्रू वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून या भागातील नागरिकांकडून नगर परिषद प्रशासन घरपट्टी/नळपट्टी नियमीतपणे वसूल करते परंतु या भागातील नागरिकांना नागरीसुविधा मात्र पुरवल्या जात नाही सदरील भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी लाखो रुपयांचा निधी अनेकवेळा कागदोपत्री खर्च झाला असला तरी पाण्याचा गंभीर प्रश्न अद्यापही मिटलेला नाही त्यामुळे आज मंगळवार दि.२१ जुन २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने नगर परिषदे समोर मनसे जिल्हा अध्यक्ष रुपेश सोनटक्के (देशमुख),तालुका अध्यक्ष अनिल बुचाले व शहराध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांच्या नेत्रुत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास ब्रँड आंबेसेटर योगेश खदारे,सोनू लाहोती जिल्हा संघटक अर्जुन टाक जिल्हा अध्यक्ष विधार्थी सेना याची प्रमुख उपस्थिती होती.
पूर्णा शहरातील आनंद नगर,आदर्श कॉलोनी,अमृत नगर,राजे संभाजी नगर,अलंकार नगर,बोर्डीकर प्लाटींग आदी भागात मागील २० ते २५ वर्षा पासून पाणी प्रश्न भेड़सावत आहे या परीसरातुन घर पट्टी,नळ पट्टीच्या माध्यमातुन नगर परिषद प्रशासनाला लाखों रुपयाचा महसुल मिळतो परंतु या भागाचे दुर्दैव दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत आहे निवडून दिलेले लोकप्रतिनिधि केवल वेळ काडू धोरन राबवतांना दिसत आहेत आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर राजे संभाजी नगर अलंकार नगर या भागासाठी अनेक वेळा लाखों रुपयाचा निधि मिळाला परंतु प्रत्यक्ष कामे झालीच नाहीत या भागात व्यापारी , नौकरदार वर्ग मोठ्या संख्येने राहतो या प्रश्नावर आवाज़ उठवाला कोणी पुढे येत नाही
गेल्यां वर्षा पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आनंद नगर आदर्श कॉलोनी अमृत नगर अलंकार नगर आदि भागासाठी जलकुंभ कींवा जलवाहिनी टाकून कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवन्याची मनसे मागणी करीत आहे परंतु नगर परिषदेतील सत्ताधारी मंडळींसह मुख्याधिकारी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निश्क्रिय नगर परिषद प्रशासना विरोधात यल्गार पुकारला असून आज मंगळवारी धरणे आंदोलनाला सुरूवात केली असून सदरील प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर पालिका समोरच खंळंन् फटयाक् आंदोलन करण्यात येईल आशा इशारा निवेदनाद्वारे मुख्याधिकारी अजय नरळे यांना मनसेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश सोनटक्के, तालुका अध्यक्ष अनिल बुचाले ,सोनू लाहोती जिल्हा संघटक, अर्जुन टाक जिल्हा अध्यक्ष विध्यार्थी सेना, शहराध्यक्ष गोविंद (राज) ठाकर पंकज राठोड,राजेश,पवन बोबडे,गुरु पूरी,मारोती घोडसे चक्रधर चव्हान, राम म्ह्त्रे,गोलू भोसले,योगेश भोसले,भारत बोबदे,सोनू ठाकूर यांच्यासह वार्डतील सेकड़ो नागरिकांनी दिला आहे....
0 टिप्पण्या