💥चेअरमन पदी सौरभ बाबुराव आवरगंड तर व्हाइस चेअरमन पदी अजय ज्ञानोबा आवरगंड यांची बिनविरोध निवड💥
पूर्णा (दि.०६ जुन २०२२) - तालुक्यातील माखणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी,संस्था बळीराजा शेतकरी विकास गट तर्फे सौरभ बाबुराव आवरगंड चेअरमन पदी तर अजय ज्ञानोबा आवरगंड यांची व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड काल रविवार दि.०५ जुन रोजी झाली आहे.
अधिक माहीतीवरुन गट प्रमुख गणेश खोंडे,किशनराव आवरगंड ,भारत आवरगंड यांच्या नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया पार पडली माझी तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव आवरगंड यांचे सुपुत्र सौरभ बाबुराव आवरगंड यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झाली तर अजय ज्ञानोबा आवरगंड यांची व्हावि चेअरमन म्हणून निवड झाली . गटामध्ये एकुण 13 उमेदवार होते त्या पैकी एसी 1,ओबीसी 1,एनटी 1,महीला 2 ,पुरूष 8 निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून सय्यद जावेद , सचिव म्हणून नरहरी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली नीवड प्रक्रिया पार पडली.अंकुराव आवरगंड, बाबुराव आवरगंड ,गणेश सोळके, माणिक आवरगंड, सुरेश आवरगंड, प्रल्हाद आवरगंड, रोहिदास आवरगंड,ज्ञानोबा आवरगंड, सुनिल सोनुळे ,मच्छीद्र गाडे ,परसराम पुरी, भगवान आवरगंड, विष्णू आवरगंड आदींनी बिननविरोध नीवड झाल्या बदल अभिनंदन केले....
0 टिप्पण्या