💥तालुक्यातील कावलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील गोदावरी काठावरील धानोरा मोत्या येथील उभ्या पिकांचे नुकसान💥
पुर्णा (दि.०१ जुन २०२२) - पुर्णा तालुक्यात काल मंगळवार दि.३१ मे २०२२ रोजी सायं.०४-०० ते ०४-३० वाजेच्या सुमारास मान्सुनपुर्व जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्याच पावसात तालुक्यातील पुर्णा शिवारासह गौर,चुडावा,कावलगाव ताडकळस आदी जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावांतील घरांसह आघाड्यावरील पत्र अक्षरशः हवेत उडाली तर शेत शिवारातील उभा उस तसेच काढलेल्या भुईमुगासह आंबा,संत्री/मोसंबी,टरबूज/खरबूज आदी फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कावलगाव जिल्हा परिषद सर्कलमधील धानोरा मोत्या येथील शेतकऱ्यांचा उभ्या ऊसाचे पिक अक्षरशः वादळी वारा व पावसामुळे आडवे पडल्यामुळे अन्नदाता शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू ढाळण्याची वेळ आली धानोरा मोत्या येथील शेतकरी भगवानराव भालेराव यांनी जंग-ए-अजितन्युज या वेब वृत्तवाहीनीला गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भातील माहितीसह विडिओ पाठवून या गंभीर परिस्थितीसह शेतकऱ्याच्या दुर्दैवी अवस्थेची माहिती दिली.
पावसाळ्याला सुरूवात होण्यापुर्वीच मान्सुनपुर्व वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील गौर,चुडावा,कावलगाव,ताडकळस,वजूर,एरंडेश्वर या जिल्हा परिषद सर्कल मधील उभ्या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूळ वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्र देखील उडाल्याने असंख्य कुटुंब उघड्यावर आली परंतु या भयावह परिस्थितीचे भान अद्यापही प्रशासनाला नसून महसुल प्ररशासनाने या झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे देखील जरूरी समजले नसल्याने तालुक्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे....
0 टिप्पण्या