💥परभणीतील नागरीकांना दिलासा परिवाराची प्रेमळ साद💥
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या आपत्तीने सर्वसामान्य नागरीक अक्षरशः होरपळून निघाला आहे. आजही तो, त्या भयंकर परिस्थितीतून पूर्णपणे सावरला नाही, हे वास्तव आहे.
दि. 15 जून पासून शाळा गजबजल्या, चिमुकल्यांनी प्रसन्न मनाने पाठीवर दप्तर घेऊन शाळा गाठली. परंतु, आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अडचणीत सापडलेल्या नागरीकांसमोर महागाईमुळे पाल्याचा प्रवेश, गणवेश शुल्क आणि शैक्षणिक साहित्य खरेदी प्रश्न एक संकट होवून पुढे उभा राहीला आहे.
नवा वर्ग, नव्या-जून्या मित्रांच्या गाठीभेटीने कमालीचे उल्हासित विद्यार्थी मात्र पालकांच्या व्यथा आणि हतबलते समोर हिरमुसले झाले आहेत. या पालकांना व गरजवंत विद्यार्थ्यांना आपण सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा समाजभान म्हणून आधार देणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी ज्यांच्या घरी ‘सायकल' असेल,कदाचित त्या अडगळीत पडलेल्या असतील त्यांच्याकडून त्या सायकली सुस्थितीत करुन,किंवा नवीनही सायकल संकलित करून दररोज पायपीट करीत शाळा गाठणार्या गरजवंत विद्यार्थ्यांना’ त्या वितरित केल्या तर आपणास समाधानाचा आनंद नक्कीच मिळेल ही खात्री आहे आणि हाच उपक्रम राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
कृपया अशा गरजवंतांच्या चेहर्यावर थोडेसे का होईना हसू फुलविण्याचे श्रेय या इष्टापूर्ती कार्यात आपण सहभागी होवून घेवू या.
यासाठी आपण आपल्याकडील किंवा आप्त, नातेवाईकांकडील अडगळीतील किंवा वापरात नसणारी सायकल सुस्थितीत करुन आमच्यापर्यंत 30 जून पर्यंत पोहोचवावी. किंवा आम्ही ती संकलित करु. त्या सायकलींचे आपण गरजू विद्यार्थ्यांना छोटेखानी कार्यक्रमाद्वारे वितरण करु आणि पर्यावरण पूरक काम ही करू, तर देताय ना साथ .......
आपले स्नेहांकित....
संतोष धारासूरकर, बंडू पाचलिंग, प्रमोद वाकोडकर, संजय मंत्री, श्रीधर देशमुख, प्रवीण देशमुख, गणेश देशमुख,शंकर आजेगांवकर, मधुकर गव्हाणे, अजय गव्हाणे, उमेश गिल्डा, भिमराव वायवळ, लक्ष्मीकांत क्षीरसागर, विश्वास कर्हाळे, संतोष आसेगावकर,संजय ठकारे, प्रवीण देशपांडे, प्रवीण चौधरी,अनुप शिरडकर,राजकूमार भांबरे,दीपक टाक,महेश पाटील,अभिजित सराफ,अशोक गूजराथी, बंडू जोशी, नवनित पाचपोर, शिरीश जयपूरकर, प्रा.अभिजित जोशी, प्रितम चक्रवार, मोहन कुलकर्णी,राजेश धारवाडकर, शूभम जाधव,संजय पांडे, प्रकाश बारबींड
अधिक माहितीसाठी:
संतोष धारासूरकर (9881300515)
प्रमोद बल्लाळ (9420878333), आशिष चिटणीस (7588081521),
अक्षय जमधाडे (9579907198) व दिलासा परिवार, परभणी
0 टिप्पण्या