💥अरे अस कुठवर चालायच आणि निमूटपणे आम्ही कुठवर सहन करायच...?


💥आम्ही सेवक म्हणून त्यांना निवडून द्यायच अन् निवडून आल्यावर त्यांनी जनसेवेचा धर्म विसरून आमच मालक बनायच💥 


✍🏻परखड सत्य - चौधरी दिनेश (रणजीत)

आम्ही सेवक म्हणून त्यांना निवडून द्यायच अन् निवडून आल्यावर त्यांनी जनसेवेचा धर्म विसरून आमच मालक बनायच अन् पहाता पहाता निवडून आलेल्या त्या लबाड लांडग्यान धन दांडग होऊन आमचाच चावा घ्यायच ? अरे अस कुठवर चालायच आणि निमूटपणे आम्ही कुठवर सहन करायच...? 

आम्ही मरे पर्यंत तत्वांशी तत्वनिष्ठ राहायच अन् धर्माच्या नावावर मतदान करून त्यांना निवडून द्यायच अन् त्यांनी मात्र तत्वांना पायदळी तुडवत स्वतःच उक्कळ पांढर करून घ्यायच अन् त्या धर्माच्या नावावर निवडून आलेल्यांनी जातीच्या नावावर शेन मातीसह गिळायच ? अरे अस कुठवर चालायच आणि निमूटपणे आम्ही कुठवर सहन करायच...? 

सत्ता अन् संपत्तीच्या हव्यासापोटी त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडायच अन् आम्ही मात्र धर्मभेद जातीभेद अन् पक्षभेदाच्या नावावर एकमेकांचे गळे धरायच वेळप्रसंगी जाळपोळ तोडफोड करायच अन् दंगलखोर म्हणून प्रत्येकाच्या नजरेत पडायच..अरे अस कुठवर चालायच आणि निमूटपणे आम्ही कुठवर सहन करायच...? 

उजेडात एकमेकांना विरोध करून त्यांनी अंधारात मात्र एकमेकांच्या उष्ट्या ताटातल हाडूक गिळायच अन् आम्ही मात्र त्यांच्या संधीसाधू राजकारणासाठी त्यांचे समर्थक/विरोधक बनून एकमेकांची डोकशी फोडायच...अरे अस कुठवर चालायच आणि निमूटपणे आम्ही कुठवर सहन करायच...? 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या