💥उध्दव ठाकरेंनी राज्यपालांकडे दिला आपला राजीनामा....!


💥देवेंद्र फडणवीस लवकरच १ जुलैला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ💥

 ✍️मोहन चौकेकर

* देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रालयाचं खातेवाटप कसं असणार ?

*भाजपकडे कोणती ?

*शिंदे गटाकडे कोणती ?

*अपक्षांकडे कोणती ?

मुंबई:-उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शिंदे गटाची साथ घेऊन देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे या नव्या सरकारकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल. त्यानंतर 1 जुलै २०२२ रोजी फडणवीस-शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेतील सर्व बंडखोर आठ आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या कमी लोकांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असंही सांगितलं जात आहे. महामंडळांवरही शिंदे समर्थकांना अधिक संधी दिली जाणार आहे. शिंदे समर्थक नाराज होऊन शिवसेनेत जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

* नगरविकास आणि गृहखाते देवेंद्र फडणवीसांकडेच :-

नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांकडे नगरविकास आणि गृहखातं राहणार असल्याचं सांगितलं जात आहे,  एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेच दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे कृषी तर उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खातचं ठेवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* बच्चू कडू, शंभुराज,सत्तारांना बढती :-

नव्या सरकारमध्ये बच्चू कडू, शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे फुल लॉबिंग केल्याचं सांगितलं जात आहे.

* सत्तेचा फॉर्म्युला काय असेल ? :-

* शिंदे यांच्याबरोबर भाजपचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार भाजपकडे 29 मंत्री असतील. तर शिंदे गटाला 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून कुणा कुणाला मंत्रिपदे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.*

* पंकजा मुंडेंना स्थान मिळणार की नाही ?

दरम्यान, नव्या सरकारमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार नसल्यांच सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत. शिवाय त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे.

*अपक्षांना संधी :-

शिंदे सरकारमध्ये ठरावीक अपक्षांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल. इतर अपक्षांना महामंडळांवर खूश केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या नव्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

* भाजपचे संभाव्य मंत्री :-

देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनंगटीवार

प्रवीण दरेकर

गिरीश महाजन

आशिष शेलार

गोपीचंद पडळकर

चंद्रशेखर बावनकुळे

राम शिंदे

नितेश राणे

संजय कुटे                                                                      

श्वेता महाले

* शिंदे समर्थक संभाव्य मंत्री :-

एकनाथ शिंदे

दीपक केसरकर

उदय सामंत

दादा भुसे

संदीपान भुमरे

गुलाबराव पाटील

बच्चू कडू

संजय राठोड

अब्दुल सत्तार

शंभुराज देसाई

प्रताप सरनाईक ,                                       

संजय सिरसाठ ,                                            

(संजय गायकवाड,संजय रायमुलकर  ) दोघांपैकी कोणा एकाची वर्णी लागणार              

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या