🌗आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याला यश : जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकाऱ्याची माहिती🌗
प्रतिनिधी
पाळीव जनावरांना सर्पदंश झाल्यानंतर देण्यात येणार दुर्मिळ इंजेक्शन (ASVS) जिल्हाभरातील जनावरांच्या प्रत्येक दवाखान्यात आता उपलब्ध असणार आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने जि प च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदना नंतर या इंजेक्शन साठी निधिची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे दिली.
परभणी जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत आठ लाख जनावरे आहेत. यात गाय, बैल, म्हैस ,शेळ्या ,मेंढ्या ,घोडे आदीचा समावेश आहे. एवढे जनावर असतानाही दुर्दैवाने सर्पदंश झाल्यानंतर त्या जनावरांना देण्यात येणार सर्पदंशावरील इंजेक्शन a.s.v.s. हे जिल्ह्यातील एकाही जनावरांच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हतं. ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 उमेदवार, आम आदमी पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले. निवेदनाद्वारे या इंजेक्शन साठी जिल्हा परिषदेने आर्थिक निधीची तरतूद करून तालुका व ग्रामस्तरावरील दवाखान्यात हे इंजेक्शन उपलब्ध करावी अशी मागणीही केली. या मागणीचा जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव आघाव यांनी गांभीर्याने विचार करून यासाठी निधी उपलब्ध केला. जिल्ह्यातील तालुका व दवाखाना स्तरावर हे सर्पदंशावरील इंजेक्शन यापुढे उपलब्ध करणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी निवेदन करते आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना लेखी पत्राद्वारे कळवले. एकूणच लाखमोलाच्या जनावरांना इंजेक्शन उपलब्ध झाल्यामुळे जीवदान मिळणार असून लेकरा इतकंच जनावरांवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठी मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सर्पदंशाने जनावर मृत्युमुखी पडल्यास नैसर्गिक आपत्ती विभागातून कसलीही शासकीय मदत मिळण्याची तरतूद नाही. यामुळे शेतकऱ्याची दोन्ही बाजूने नुकसान होत होते. परभणी जिल्ह्याच्या इतिहासात आजपर्यंत जिल्हा परिषद अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही जनावराच्या दवाखान्यात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नव्हते. ते पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे हे विशेष. सखाराम बोबडे पडेगावकर , यांचे सह राजे मल्हार मित्र मंडळाचे नारायणराव घनवटे, माजी सरपंच जयदेव मिसे, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्र्वर भोसले, धनगर साम्राज्य सेनेचे जिलहाध्यक्ष रविकांत हरकळ, राजकुमार दंडवते, मुंजाभाऊ लांडे , विक्रमबाबा इमडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने याबद्दल शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे....
0 टिप्पण्या