💥शिक्षक भरतीच्या मागणीसाठी आजेगाव करांचा अनोखा निषेध....!


💥शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात भरवली शाळा लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागें💥 

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील अाजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील  रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी पालकांनी विध्यार्थी सोबत घेऊन आज दि .20/06/2022 रोजी शिक्षणाधीकारी संदीप सोनटक्के यांच्या दालनात शाळा भरवली आहे जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागें घेणार नाही अशी  भूमिका पालकांनी घेतली होती सेनगाव तालुक्यातील अाजेगाव येथे इयत्ता पहीली ते दहावी पर्यन्त शाळा आहे या ठिकाणी  अंदाजे 300पेक्षा जास्त विध्यार्थी असून त्याना शिकवण्यासाठी शिक्षकांची 13 पदे मंजूर आहेत मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून पाच पदे रिक्त आहेत या मधे मुख्याध्यापकासह .प्राथमिक पदवीधर .प्राथमिक शिक्षक व गणित इंग्रजी विषयाचे दोन शिक्षक असे पाच पदे रिक्त आहेत  त्यामुळे विध्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 


* शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत अशी ग्रामस्थांची मागणी :-

शिक्षकांची रिक्तपदे तातडीने भरावीत या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक विभागाला निवेदन दिले होते मात्र या कडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केले त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळी 12 वाजता विध्यार्थीना घेऊन थेट जिल्हा परिषदचा शिक्षण विभागा जाऊन शाळा भरवली शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के यांच्या दालनातशाळा भरवली व विध्यार्थीची गर्दी पाहून शिक्षण अधिकारी गोंधळून गेले गावकऱ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरल्या शिवाय आंदोलन मागें घेतले जाणार नाही अशी भूमिकावर ग्रामस्थ ठाम होते 15 जुलै पर्यन्त शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्यामुळे शाळेवर शिक्षक देण्याचे आश्वासन शिक्षण अधिकारी सोनटक्के यांनी दिले होते मात्र त्याचे तोंडी आश्वासन ग्रामस्थांना मान्य नव्हते जेव्हा शिक्षक अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले या  मधे 15 जुलै नंतर ऑनलाईन बदल्या झाल्या नंतर सात दिवसाच्या हात शिक्षक देण्यात येतील असे लेखी आश्वासन आजेगाव येथील ग्रामस्थांना दिले आहे तेव्हा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन मागें घेण्यात आले आहे....

प्रतिक्रिया :-


आमच्या आजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 13 शिक्षकांची पदे मजूर आहेत मात्र त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत मुख्याध्यापकासह गणित व इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे विध्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत गेल्या चार ते पाच वर्षा पासून हि पदे रिक्त आहेत विशेष म्हंजे   शिक्षणमंत्री वर्षा ताई गायकवाड ह्या हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात विध्यार्थीना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने शिक्षकांची रिक्त पदे भरावेत व आत्ता आम्ही शांततेने आंदोलन केले आहे शिक्षक जर नाही मिळाले तर पुढील आंदोलन वेगळे असेल शिकणधीकारी संदीप सोनटक्के यांच्या लेखी आश्वासना नंतर आम्ही आंदोलन मागें घेत आहोत 

वैशालीताई वाघ - राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या