💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे पावसाळ्यापूर्वी बौद्ध स्मशान भूमीची साफसफाई...!


💥याप्रसंगी पत्रकार सुरेश मगरे यांच्या नेतृत्वाखालील भिमसैनिकांचा कौतुकास्पद उपक्रम💥


पुर्णा : तालुक्यातील ताडकळस येथे पावसाळ्यापूर्वी बौद्ध स्मशान भूमीची साफसफाई करण्यात आली यावेळी बौद्ध स्मशान भूमीत सर्वत्र झाडझूड करून काडीकचरा पेटवुन देण्यात आला. तसेच साफसफाई करून स्मशान भूमीतील झाडांना पाणी दिले. 

याप्रसंगी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश मगरे यांच्या नेतृत्वाखाली कैलास मगरे, विकास मगरे,अविनाश मगरे, पवन डहाळे, शुध्दोधन सानके, नारायण तिगोटे आदी भिमसैनिकांनी बौद्ध स्मशान भूमी स्वच्छतेचा हा कौतुकास्पद उपक्रम राबविला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या