💥परभणीत भाजपा राष्ट्रीय महिला प्रवक्ता नुपूर शर्माचा मुस्लिम समाजाने केला जोरदार निषेध...!


💥मुस्लीम धर्मियांचे पैगंबर महंमद यांच्या विषयी नुपूर शर्मा यांचे आक्षेपार्ह विधान : कठोर कार्यवाहीची केली मागणी💥

परभणी(दि.१० जुन २०२२) :  भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी टाईम्सनाऊ वरील लाईव्ह टिव्ही चर्चा सत्रात मुस्लीम धर्माचे पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषधार्थ परभणीतील मुस्लिम समाजातील संतप्त नागरीकांनी आज शुक्रवार दि.१० जून २०२२ रोजी दुपारच्या नमाज पठणानंतर जोरदार निषेध मोर्चा काढला.

         शाही मस्जिद, स्टेशनरोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी दुपारी निघालेल्या या मोर्चात हजारो तरुण सहभागी होते. या मोर्चेकर्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करीत स्टेशनरोड दणाणून सोडला. या  सादर करीत नुपूर शर्मा यांना तात्काळ अटक करावी, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या