💥भारतात अग्रस्थानी अग्रवाल समाजाची शान कायम ठेवा - सौ. मालती गुप्ता


💥महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला संमेलनचे संपर्क अभियान💥

फुलचंद भगत

वाशिम-अग्ननारी प्रांतिक महिला संघ संचलित महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला संमेलनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवार, १४ जून रोजी स्थानिक अग्रसेन भवन येथे अग्रवाल महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सौ. ललिता अग्रवाल आणि मिना अग्रवाल यांनी स्वागत गीत गाऊन सभेची सुरुवात केली. वंदना अग्रवाल आणि कु. कोमल अग्रवाल यांनी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रांताध्यक्ष सौ. मालती गुप्ता यांचे स्वागत सौ. मिना कंदोई, जालना उपाध्यक्षा कु. सुनंदा तंबाखुवाला यांचे स्वागत सौ. ज्योती अग्रवाल वाशिम व सौ. ज्योती अग्रवाल मसलापेन यांनी केले. प्रांतीय महामंत्री सौ. उषा अग्रवाल अकोला यांचे स्वागत सौ. चंदा अग्रवाल शेंदुरजना यांनी केले. अकोला जिल्हाध्यक्ष सौ. लता खिरवाल यांचे स्वागत सौ. प्रीती अग्रवाल, वाशिम जिल्हाध्यक्षा सौ. मिना कंदोई यांचे स्वागत सौ. मेघा अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमात प्रांताध्यक्षा सौ. मालती गुप्ता यांनी समाजात होत असलेल्या चांगल्या बदलांची सविस्तर चर्चा करून अग्रवाल समाज भारतात आघाडीवर आहे, त्यामुळे अग्रवाल समाजाची शान कायम ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. चंदा अग्रवाल, आभार प्रदर्शन सौ. शिल्पा अग्रवाल यांनी केले. बैठकीत हरकचंद अग्रवाल, किसन अग्रवाल, राजेश अग्रवाल, राजकुमार कोयालीवाले यांच्यासह अग्रवाल समाजाच्या सर्व महिला उपस्थित होत्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या