💥शहरातील जिल्हा परिषद येथे आयोजित शिवस्वराज्यदिन कार्यक्रमास सकाळी ०९;०० राहणार उपस्थित💥
परभणी (दि.०५ जुन २०२२) : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे हे उद्या सोमवार दि.०६ जुन रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.०६ जून २०२२ रोजी मोटारीने सकाळी ०९-०० वाजता परभणी येथे आगमन व शिवस्वराज्यदिन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- जिल्हा परिषद परभणी), सकाळी ०९:३० वाजता माजु लाला उर्फ सय्यद समी यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- शाही मस्जिद जवळ ),सकाळी १०-०० वाजता सय्यद तुराबुल हक्क साहेब दर्ग्याचे दर्शन करतील यानंतर सकाळी १०-३० वाजता वानखेडे बाल रुग्णालय उद्घाटन ( स्थळ:- गव्हाणे चौक परभणी), सकाळी १०:४५ वाजता परभणी येथून मोटारीने सेलूकडे प्रयाण करतील. सकाळी ११:४५ वाजता सेलू येथे आगमन व श्री.केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर येथे दर्शन करतील. दुपारी १२;०० वाजता सेलू येथील सय्यद शहाबुद्दिन शहा अ.र. दर्ग्याचे दर्शन करतील. दुपारी १२:१५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती (स्थळ -साई नाट्यगृह सेलू), दुपारी ०२;०० वाजता सेलू येथील श्री.अशोक नाना काकडे यांच्या घरी सदिच्छा भेट, दुपारी ०२:३० वाजता सेलू येथून जिंतूर कडे प्रयाण करतील. दुपारी ०३:३० वाजता सेलू व जिंतूर तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गाची शासकीय बैठक (स्थळ- किशनराव विद्यालय संभाजीनगर जिंतुर), दुपारी ०४;०० वाजता समर्थ पेट्रोलियम पंपाचे उद्घाटन( स्थळ औंढा रोड जिंतूर), दुपारी ०४:३० वाजता सम्राट अशोक संविधान भवन या नवीन वास्तूस भेट व बौद्ध समाज मेळावा ( स्थळ- हुतात्मा स्मारक जिंतूर), सायंकाळी ०६:३० वाजता माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या गोदावरी निवासस्थानी सदिच्छा भेट, सायंकाळी ०७:१५ वाजता जलील मौलाना यांच्या निवासस्थानी ईद मिलन कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार जिंतूर येथून मोटारीने सेलू कडे प्रयाण करतील. रात्री ०९:०४ वाजता देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील....
-*-*-*-*-
0 टिप्पण्या