💥परभणी जिल्ह्यातील सेलू येथे ०७ जून रोजी मिरगाच्या कविता कार्यक्रमाचे आयोजन...!


💥शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम💥

सेलू (दि.०६ जुन २०२२) : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवार ( दि. ०७ ) रोजी कविता मिरगाच्या हे वार्षिक कवी संमेलन व कवी प्रदीप इक्कर यांच्या ' हिरवा पांडुरंग ' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल भुसारे ( शिक्षणाधिकारी प्राथमिक, परभणी ) हे उपस्थितीत राहणार आहेत. डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. 

तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक पाठक,  मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांची उपस्थिती राहणार आहे. कविता संग्रहावर अरूण चव्हाळ , डॉ. केशव खटींग, प्रदीप देशमुख हे भाष्य करणार आहेत. या वर्षी मिरगाच्या कविता या कवी संमेलनात प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे ( लातूर ), भाग्यश्री केसकर ( उस्मानाबाद ), प्रदीप इक्कर ( मंठा ) यांचा सहभाग असून सुत्रसंचलन रवी केसकर ( उस्मानाबाद ) हे करणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश हिवाळे, शरद ठाकर, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, माधव गव्हाणे, डॉ. राजाराम झोडगे, डॉ. सतीश मगर परिश्रम घेत आहेत. ०७ जून रोजी सायंकाळी ०६.३० वाजता  स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलूच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या