💥सिकंद्राबाद रेल्वेस्थानकावरील जाळपोळीच्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर तीन एक्सप्रेस रेल्वेगाड्या रद्द....!


💥देवगिरी एक्सप्रेस उशिराच धावणार💥

परभणी (दि.१८ जुन २०२२) : सिकंद्राबाद रेल्वेस्थानकावरील जाळपोळीच्या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने शनिवारी मनमाड रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या १७०६३ मनमाड-सिकंद्राबाद अजिंठा एक्सप्रेस,श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या १७००१ - श्री साई नगर सिर्डी-सिकंद्राबाद एक्सप्रेस व पटना रेल्वेस्थानकावरुन सुटणारी गाडी संख्या १७६०९ पटना-पूर्णा एक्सप्रेस या तीन एक्सप्रेस गाड्या पूर्णतः रद्द केल्या आहेत.

          तेलंगणातील सिकंद्राबाद रेल्वेस्थानकावर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळीसह हिंसक असे प्रकार केले. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. शुक्रवारी दक्षिण मध्य रेल्वे विभागातून धावणार्‍या श्री नगर शिर्डी, अजिंठा एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. काही रेल्वेगाड्या अंशतः रेद्द करण्यात आल्या. तर काही रेल्वेगाड्या अन्यत्र वळविण्यात आल्या. नांदेड, पूर्णा, परभणी मार्गे मुंबईकडे धावणारी देवगिरी एक्सप्रेस ५ तास ४० मिनिटे उशीराने धावली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा तडाखा बसला. शुक्रवारप्रमाणे शनिवारीसुध्दा या हिंसक आंदोलनाचे परिणाम मराठवाड्यातील प्रवाशांना भोगावे लागले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या