💥सरदार लड्डूसिंघ महाजन समाजाला समर्पित व्यक्तिमत्व - चरणजीतसिंघ अटवाल


💥"शेवट पर्यन्त समाजकार्याला प्राधान्य देणार" महाजन यांचे आभार शब्द💥 


नांदेड (दि.२८ जुन २०२२) - श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या वास्तव्यात आणि श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांच्या कायम सान्निध्यात वावरणाऱ्या समाजात स. लड्डू सिंघ महाजन व्यक्तिमत्व समर्पित भावनेने संपूर्ण आयुष्य सेवा करत आला आहे. त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाल्याचा मला मनस्वी आनंद आहे. असे प्रतिपादन लोइकसभेचे मजी उप सभापति  स. चरणजीत सिंघ अटवाल यांनी रविवारी रात्री अबचल नगर मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या अमृतमहोत्सव सत्कार समारंभ कार्यक्रम मध्ये केले. कार्यक्रमात आशीर्वाद देण्यासाठी गुरुद्वारा तखत सचखंड साहेबचे मीत जत्थेदार संत बाबा  ज्योतींदर सिंघजी, सहायक जत्थेदार संत बाबा रामसिंघजी, हेडग्रंथी  सिंघ साहेब भाई कशमीर सिंघजी, मीतग्रंथी सिंघसाहेब भाई गुरमितसिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, जत्थेदार संतबाबा तेजसिंघजी मातासाहेबवाले,सचिदानंद शास्त्री बालाजी मंदिर , माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटिल, माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, नांदेडचे खासदार प्रतापराव  चिखलीकर, माजी गृहराज्य मंत्री डॉ. माधव पाटील किन्हाळकर, डी पी सावंत माजी मंत्री ,नांदेडच्या महापौर जयश्री निलेश पावडे, गुरुद्वारा नानकझीरा साहेब बिदर ट्रस्टचे अध्यक्ष स. बलबीर सिंघ  यांची उपस्थिती होती. तर विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून शेर सिंघजी फौजी, वाधवा सुप्रिडेंट,प्रवीण साले, डॉ. हंसराज वैद्य, भागिन्दर सिंघ घड़ीसाज, इंदर सिंघ शाहू, सुखविंदर सिंह हुंदल,महेंद्र सिंह लांगरी ,अजीतपाल सिंघ संधू, राजवंत सिंघ कदम, दर्शन सिंघजी सोढ़ी, सुरिंदर सिंघजी ओबेरॉय, जैमल सिंघ रंधावा, ओंकार सिंघ वरंगक,सहित मोठ्या संख्येत प्रतिष्ठित पाहुणे व मित्र परिवार उपस्थित होता. 


चरणजीतसिंघ अटवाल पुढे म्हणाले, माझी आणि स. लड्डूसिंघ महाजन यांची ओळख फार जूनी आहे. त्यांनी केलेल्या जवळपास सर्वच कार्यांची मला माहिती आहे. शीख धर्मीय गुरूंनी इतर धर्मांचे सन्मान करणे, गरजूं लोकांची मदत करणे, अन्याय अत्याचारा विरुद्ध संघर्ष करण्याचे उपदेश दिले आहेत. तसेच या कार्यासाठी गुरु तेगबहादुर साहेब आणि गुरु गोबिंदसिंघजी यांच्या कुटुम्बियांचे बलिदान झाले. हजूर साहिब नांदेड मधील शीख समाज धार्मिक मुल्यांच्या बाबतीत जागरूक आहे. स. लड्डूसिंघ आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्याच मुल्यांवर चालत आलेले आहेत. आज त्यांचा अमृत महोत्सव साजरा करतांना अतिशय आनंद होत आहे. 


वरील कार्यक्रमात संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवा वाले यांनी आशीर्वादपर भाषण केले. माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम आपल्या भाषणात लड्डूसिंघ महाजन यांच्या जीवनाच्या अनेक घटना सांगितले. ते पुढे म्हणाले, ऑपरेशन ब्लू स्टारच्या घटनेनंतर तत्कालीन केंद्र शासनाने लड्डूसिंघ महाजन यांना सरबत खालसा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना प्रलोभनं देण्यात आली. पण त्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला. जर तो निर्णय मान्य केला असता तर त्यांना मंत्री पद मिळाले असते. 

डॉ. माधवराव किन्हाळकर आपल्या मनोगतात म्हणाले की, स. लड्डूसिंघ महाजन यांनी समाजकारण, राजकरण सोबत क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले योगदान खूप महत्वपूर्ण असे आहेत. त्यांनी स्व. नरेंद्रपाल बरारा, मधुकरराव जालनेकर, विनायकराव नांदेडकर व इतर लोकांच्या सोबतीने सिल्वर कप हॉकी, गोल्ड कप हॉकी सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजन करून असंख्य खेळाडूंना संधी निर्माण करून दिली. त्यांनी बोर्डाचे कुशल संचालन केले तसेच गुरुतागद्दी योजनेत विकास आरखड्याच्या अमलबजावणी साठी परिश्रम केले. 


माजी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटिल यांनी आपले मनोगत मांडतांना सांगितले की, माझा राजकारणात प्रवेश लड्डूसिंघ महाजन यांच्या सोबतच झाला. 1974 साली आम्ही नगरपालिकेची निवडणूक जिंकून सभागृहात दाखल झालो आणि नंतर पुढे राजकारणात इतिहास घडत गेले. ते गुरुद्वारा बोर्डाच्या राजकारणाकडे वळले, बोर्डाचे अध्यक्ष झाले. मी आमदार झाले नंतर मंत्री झाले. लड्डूसिंघ महाजन देखील सक्रिय रहिलेत. त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षाची कहानी आहे. जर त्यांनी व्यैक्तिक स्वार्थ पहिला असता तर ते मोठ्या पदावर गेले असते. पण त्यांनी समाजाकडे पहिले आणि अमीषाला बळी पडले नाही. 

त्या पुढे म्हणाले की, गेली पन्नासएकवर्ष आम्ही भाऊ - बहीण या नात्याने कार्यकरीत आलो आहोत आणि पुढे ही महाजन कुटुंबीयांशी तेच नाते कायम राहणार आहे. त्यांच्या पत्नी सौ. कुलतारकौर यांनाही आज शुभेच्छा देत आहे, ज्यांच्या मुळे महाजन कुटुंब एकवट व सुशिक्षित राहिला आहे.

* पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या : 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक निर्माणकार्य मंत्री श्री अशोकराव चव्हाण यांनी अमृतमहोत्सव प्रसंगी सरदार लड्डूसिंघ महाजन यांना शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री पुढे म्हणाले, की लड्डूसिंघ महाजन यांनी प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहेत. त्यांचे समाजस्तरावर होत असलेल्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छा असून देखील राहाता आले नाही. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी चालू असल्याने मला उपस्थित रहता आले नाही. पण मी नांदेडला त्यांना भेटून शुभेच्छा देणार आहे. 

* जीवन कृतज्ञन झाले : महाजन 

आपल्या सत्काराला उत्तर देतांना स. लड्डूसिंघ महाजन म्हणाले की, एवढ्या भव्य दिव्य क्षणाचे मला साक्षी होता आले, हे माझे नशीब समजतो. मला वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करायला मिळाले. लोकं ही चांगली मिळाली. कुटुम्बियांचा सकारात्मक सहकार्य लाभले. त्यामुळे खुपकाही साधता आले. आज पंजप्यारे, संत, प्रतिष्ठित नेते, सर्वपक्षीय मंडळी आणि समाजासमोर माझे अमृतमहोत्सव साकार झाल्याचे आनंद आहे. संयोजन समिती आणि मित्रपरिवाराचे खूप - खूप आभारी आहे, मी आज कृतज्ञं झालो आहे. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजन समितीचे प्रमुख आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य गुरुबचनसिंघ सिलेदार यांनी केले तर आभारप्रदर्शन गुरुद्वारा बोर्ड सदस्य गुरमीतसिंघ महाजन यांनी केले पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी सन्मान पत्राचे वाचन केले शाल,श्रीफल, सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे गौरव करण्यात आले. वैयक्तिक रीतियां ही त्यांचे सत्कार पार पडले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या