💥कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन...!


💥बीबिएफ पेरणी तंत्रज्ञानाचा वापर करा,सेंद्रिय कर्ब वाढवा - डॉ.गडदे  


   पूर्णा (दि.28 जुन 2022) - तालुक्यातील मजलापुर येथे दिनांक 28 मंगळवार रोजी कृषी संजीवनी महोत्सवांतर्गत खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये गावचे सरपंच काशिनाथराव जाधव अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा परभणी विजय लोखंडे व.ना.म.कृ.वि. परभणी येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे  उपस्थित होते यावेळी डॉ. गडदे यांनी रासायनिक खताचा विद्यापीठाच्या शिफारशी प्रमाणे वापर  करावा तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जैविक खते , धैंचा ताग यासारखे हिरवळीची खते याचा वापर करावा तसेच सोयाबीन पेरणी बीज प्रक्रिया करून बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी पूर्णा रामचंद्र तांबिले यांनी केले यावेळी त्यांनी सोयाबीन मध्ये तूर पीक घेऊन ठिबक चा वापर करून विरघळणारी खते ठिबकद्वारे दिल्यास 90 टक्के खताचा फायदा होतो असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी पिकावर नॅनो युरिया फवारले तर 90% पिकावर उपयोगी पडते , पाट पाणी बंद करून ठिबकचा पर्याय निवडा नाही तर जमिनी खराब होतील व उत्त्पादन घटेल असा संदेश दिला.

यावेळी  उद्यान पंडित पुरस्कार शेतकरी प्रताप काळे यांनी करवंदाचा बांधावर कुंपण म्हणून पर्याय घ्यायला हरकत नाही कारण रानडुकरे ,वन्यप्राणी प्रचंड नुकसान करत आहेत त्यामुळे ऊस  लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले प्रगतीशील शेतकरी श्री बालासाहेब हिंगे यांनी जमिनीत काडीकचरा कुजवून  कर्ब प्रमाण वाढवावे असे शेतकऱ्यांना सांगितले ऊसातील पाचोळा जाळून न टाकता शेतातच कुजविले  पाहिजे असेही सुचविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा विभागाचे रवी माने यांनी केले आत्मा गट स्थापन करण्याविषयी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले.

 अध्यक्षीय समारोप व आभार प्रदर्शन  सरपंच काशिनाथराव जाधव यांनी केले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अडसुळे  कृषी पर्यवेक्षक पाईकराव कृषी सहाय्यक देशमाने यांचेसह काशिनाथ जाधव ,जनार्दनजाधव सुभाषराव हिंगे ,पंडितराव जाधव ,अच्युतराव जाधव, त्र्यंबक जाधव, धनंजय हिंगे, जनार्दन हिंगे,रमेश जाधव बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

येथील पद्मावती सार्वजनिक वाचनालयास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  विजय लोखंडे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल रमेश जाधव यांनी स्वागत केले. यावेळी लोखंडे यांनी  कृषी विषयक विविध पुस्तके वाचनालयात ठेवावेत असे सुचविले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या