💥राजकारण करतानी समाजकारणाला मोठे महत्त्व दिले - नानासाहेब राऊत चारठाणा


💥यापुढे आपण काँग्रेस पक्षात राहून जनतेचे कोणतेही कामे करण्यास सदैव तत्पर राहील असेही ते म्हणाले💥


प्रभाकर कुर्हे चारठाणकर

चारठाणा माझी जन्मभूमी आहे व मला चारठाणा भूमीत जन्माला आलो हे माझे भाग्यचं म्हणावे लागेल राजकारण करतांना समाजकारणाला आपण ज्यास्त महत्त्व दिले आहे या गावाने या मातीने संस्कार दिले या राजकीय क्षेत्रात आपण तीन आमदार घडविले यापुढे आपण काँग्रेस पक्षात राहून जनतेचे कोणतेही कामे करण्यास सदैव तत्पर राहील राजकारण करताना वीस टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण करत आलो आहे असे प्रतिपादन परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष व समता परिषदेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब राऊत यांनी चारठाणा येथे आपल्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना सांगितले चारठाणा येथील बस स्थानक परिसरातील विविध कार्यकारी सोसायटी च्या मैदानात सुसज्ज असा मंडप टाकून दिनांक सात जून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता चारठाणा येथील ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी नानासाहेब राऊत यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध चव्हाण उपसरपंच ,वाजिद कुरेशी , कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती बोरी राजेभाऊ नागरे ,तालुकाध्यक्ष गणेश काजळे, माजी उपसरपंच तहेसिन देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुऱ्हे, कृष्णा राऊत, चेअरमन किरण देशमुख, व्हाईस चेअरमन एकबालदिन काजी, अबेद देशमुख, समीयोदिन काजी, संतोष देशपांडे, सय्यद दाऊद अली ,बाळकृष्ण मुळे जनार्धन जोशी, सय्यद हामिद अली, डॉक्टर टापरे ,चिंतामण दौंड ,अर्शन लाला, इरशाद पाशा आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक खुशाल मुंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुऱ्हे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब मेहेत्रे, ग्रा.प.सदस्य सलाम इनामदार, सय्यद रेहमत अली ,शिवशंकर तमशेटे रामा चव्‍हाण, सुधाकर क्षीरसागर,संदीप देशमुख,नानासाहेब निकाळजे, बद्रोदीन काझी, नईमुद्दीन काजी,शे.आसेफ,एकनाथ चव्हाण, दादूल भवाळे, सिद्धार्थ निकाळजे , बबलू चव्हाण, रंगनाथ गडदे, आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या