💥जिंतूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेची कामे तात्काळ मार्गी लावा - मा.आ.विजय भांबळे


💥तहसील कार्यालयातील बैठकीत मा.आ.भांबळे यांनी केले तहसिलदारांसह सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना आवाहन💥

जिंतूर प्रतिनिधी /बि.डी .रामपूरकर

जिंतूर येथे सर्व सामान्य नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावा यासाठी आज गुरुवार रोजी मा.आ. विजयराव भांबळे यांनी तहसील कार्यालय, जिंतूर येथे बैठक घेऊन तहसीलदार यांना सूचना दिल्या.


जिंतूर तालुक्यातील सर्व मान्य नागरिकाची कामे दिवसापासून प्रलंबित असून त्यात अनेक शेतरस्ते, शिवरस्ते लोकांनी अतिक्रमण  केल्याने अनेक शेतात जाणे अडचणीचे  होत आहे. अनेक शेतकरी यांचे फेरफार चुकीचे लावले गेल्याने ७/१२ वर जमिनी कमी जास्त झालेल्या आहेत परिणामी त्यांना जमिनीची वाटप व विविध योजनाही  घेण्यास त्रास होत आहेत. असे अनुदानापासून बरेच शेतकरी आजपर्यंत वंचित राहिले आहेत. तर जमिनीवरील अतिक्रमणे, गावठाण जमिनीवरील अतिक्रमणे अनुदान नैसर्गिक आपत्ती मधील अनुदान, श्रावणबाळ योजना विविध अनुदान योजनेचे अनेक दिवसापासून  कार्यालयात पडुनआहेत. या सर्व समस्या घेऊन मा.आ.विजयराव भांबळे यांनी तहसीलदार श्री मांडवगडे यांच्याशी त्यांच्या दालनात बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करुन नागरिकांचे प्रश्न सोडण्यात याव्यात अश्या सूचना दिल्या आहेत.

या वेळी जिल्हा परिषद सभापती रामराव उबाले , विश्वनाथ राठोड जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घुगे, अभिनव राऊत,  मुरलीधर मते, रा.काअ. मनोज थिटे, माजी माजी सभापती भवाळे, नगरसेवक उस्मान पठान, दलमीर पठाण शोएब, जानिमीया, शोकत लाला, मकसूद पठाण, शंकर जाधव, सलीम भाई ,रवी देशमुख, कपल जाधव, मेहेत्रे,  आप्पा तरटे, सुलेमान शेख तर सदर बैठकीस तसीलदार  मांडवगडे ,नायब तहसीलदार चौधरी, भूमीअभीलेख कर्मचारी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्त्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या