💥जिंतूर येथे जागतिक 'योग दिन' उत्साहात साजरा....!


💥योग दिन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व आरोग्यवर्धनी योगशिक्षक संघ यांच्या वतीने यशस्वीरीत्या साजरा💥 

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर : शहरातील माऊली मंगल कार्यालयात आज दि.२१ जुन रोजी सकाळी ७ वा .ते  ८ वा जागतिक योग दिन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व आरोग्यवर्धनी योगशिक्षक संघ यांच्या वतीने यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.


      यावेळी तालुका समन्वयक व योग शिक्षक डॉ शिवप्रसाद सानप यांनी प्रोटोकॉल प्रमाणे प्रार्थना , सूक्ष्म व्यायाम , आसने , प्राणायाम , शांतीपाठ द्वारे उत्तम प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले यावेळी कु. श्रेया कु. सानवी प्रशांत घीके  या दोन बहिणी सुंदर असण व प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी मंचावर योगशिक्षक सचिन रायपत्रिवार , बाळासाहेब रामपूरकर सोबत उपस्थित होते .

जिंतूर तालुक्यातील सर्व ठिकाणी जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . राहुल गिते , जिल्हा आयुष अधिकारी डॉ वडमिलवार सर यांचे विशेष मार्गदर्शन व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश बोराळकर यांचे सहकार्य लाभले .

या योग दिनात आरोग्य अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी ,  कर्मचारी, आरोग्यवर्धनीचे योग  शिक्षक ,नगरपरिषद कर्मचारी, व्यापारी वर्ग आणि मिडिया पत्रकार संघ व इतर योग साधक बांधव व भगिनींनी सहभाग नोंदवला .

 हा योग दिन यशस्वी करण्यासाठी दिलीप राठोड ,श्रीमती एस पी सिडाम, दत्तात्रय कोटकर, विजयकुमार ढगे,दत्तात्रय काळे, स्वामी . देशमुख, श्रीमती शीला भुते व आरोग्य वर्धनी योगशिक्षक संघातील सर्व योग शिक्षक यांनी अनमोल सहकार्य केले .

* जिंतूर तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक योग दिन साजरा :-

आज जागतीक योगदिना निमीत्त जिंतूर तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केंद्र, आर्युवेदीक दवाखाना,उपकेंद्र, शाळा, पोलीस स्टेशन, आदी पीकाची योग सत्राचे आयोजन करुन हा जागतीक योगदीन उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत माहीती अशी की,जिंतूर तालुक्यातील सर्व शाळांमधून योग दिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर आरोग्य विभागातर्फे आरोग्यवर्धिनी व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य दिन योगसूत्र घेऊन साजरा करण्यात आला यावेळी योगशिक्षक, नागरिक, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, पोलिस, अनेकांनी या मध्ये उत्साहात सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या