💥सेलू येथे खेलो इंडिया युथ गेम्स गतका खेळाडूंचा ढोलताशांच्या गजरात स्वागत....!


💥यावेळी खेळाडूंच्या स्वागताला शहरातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती💥

 सेलू प्रतिनिधी --

सेलू येथील खेळाडू दि.९ जुन रोजी हरियाणा येथील पंचकूला येथे झालेल्या चौथी खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गतका या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवणारे कु.तेजस्विनी महाजन, सपना खरात,अमृता दिग्रसकर, चि.ॠषिकेश पेटारे खेळाडूंचा सेलू रेल्वे स्थानकावर ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

४ थी खेलो इंडिया युथ गेम्स 

3 ते  ७ जून 2022 दरम्यान   हरियाणा पंचकूला येथे संपन्न झाल्या आहेत.  त्यासाठी गतका या खेळ प्रकारात महाराष्ट्रातून  आठ मुली व आठ मुले असे एकूण सोळा खेळाडू ची निवड झाली आहे . यात दोन गटात महाराष्ट्र संघास दोन कांस्यपदक पटकावले आहे. यामध्ये फरी स्टिक  इव्हेंट या खेळ प्रकारातून 

नंदनी पारदे ,जानवी खिस्ते , शुभांगी अंबुरे ,सीमा खिस्ते,

सिंगल सुट्टी टीम इव्हेंट :सपना खरात, तेजस्विनी महाजन , अमृता दिग्रसकर, विजयालक्ष्मी पिंपरीकर,

मुले संघात  परी स्टिक टीम इव्हेंट  गोविंदा अंबुरे ,स्वरूप मोगले, अथर्व सवंडकर , 

सिंगल स्टिक टीम इव्हेंट,

 प्रथमेश गरुड, ऋषिकेश

पेठारे ,लक्ष्मण पवार, विश्वजीत खिलारे व प्रशिक्षक पदी  मास्टर पांडुरंग आंबोरे यांची निवड करण्यात आली. 

या प्रसंगी क्रीडा माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नूतन चे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक डी.डी.सोन्नेकर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, क्रीडा मार्गदर्शक सतिश नावाडे, गतका खेळांचे प्रशिक्षक पंकज सोनी, सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव, सुनिल गायकवाड, कराटे प्रशिक्षक राजेश ढवळे,काकडे, पालकवर्ग उपस्थित होते

 जिल्हाधिकारी मॅडम आंचल गोयल व जिल्हा क्रिडाअधिकारी नरेंद्र पवार क्रीडाधिकारी नानकसिंग बस्सी, संजय मुंडे ,अजित दादा वरपूडकर , डॉ. एस.एम. लोया,डी.के. देशपांडे,  डॉ.व्हि.के. कोठेकर, जयप्रकाश बिहाणी. यांनी अभिनंदन केले व सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या