💥मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार....!


💥बायपासच्या मागणीसाठी सव्वा दोन तास रास्ता रोको आंदोलन💥


(फुलचंद भगत)

वाशिम:-आयशर मालवाहू गाडीने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी,पिकअप गाडी व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जबर धडक देवून सदर वाहन पलटी झाले‌.  या घटनेत मोटर सायकल स्वार नारायण वरघट गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचाराकरिता अकोल्याला  हलविण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. सदर घटना दि २८ जूनच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान  तऱ्हाळा येथे घडली. 


              या घटनेनंतर दि २९ रोजी संतप्त ग्रामस्थांनी नागपुर औरंगाबाद दृतगती मार्गाच्या तर्‍हाळा बायपासचे काम त्वरीत सुरु करावे या मागणीसाठी तब्बल सव्वा दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. तर्‍हाळा व शेलूबाजार बायपास मंजुर होऊन अनेक वर्षांपासून काम करण्यात आले नाही.परीणामी महामार्गावरील वाहणे  गावातून  सुसाट वेगाने धावत असल्याने  नागरिकांना जीव वाचवित रस्ता ओलांडावे लागत आहे. त्यामुळे त्वरीत बायपासचे रखडलेले काम मार्गी लावावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी   रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी  पोलीस उपनिरीक्षक तुषार जाधव, मंजुषा मोरे व स्थानीक चौकाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिक आंदाेलन मागे घेण्याच्या परिस्थिती नव्हते. अखेर नायब तहसीलदार रवि राठोड यांनी घटनास्थळाला भेट देवून आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. यावेळी संबंधीतांनी बायपासचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी तऱ्हाळा ग्रामवासी तथा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली यावेळी  ४ महिन्यात बायपासचे काम सुरु करण्याचे आश्वसन अधिकाऱ्यांनी दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या सव्वा दोन तासात कारंजा- शेलूबाजार मार्गावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. तर शेलूबाजार कडून कारंजा कडे जाणारी सर्व वाहने मंगरुळपीर मार्गे वळविण्यात आली होती.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या