💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखपदी रामेश्वर जाधव व नरेश जोगदंड यांची नियुक्ती...!


💥तर चुडावा सर्कल प्रमुखपदी श्रीहरी इंगोले व खुजडा सर्कल प्रमुखपदी गजानन कुऱ्हे यांची नियुक्ती जाहीर💥

परभणी - परभणी जिल्हा कार्यकारणी ची बैठक प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज दि. २६ जून २०२२ रोजी पार पडली असून या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संधर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली याच बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या काही रिक्त पदावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सर्वानु मते जाहीर करण्यात आल्या.

या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी व जिंतूर विधानसभा क्षेत्रासाठी उपजिल्हा प्रमुख म्हणून पक्षाचे जुने कार्यकर्ते पाथरा येथील रामेश्वर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तर गंगाखेड व पाथरी विधानसभा क्षेत्रासाठी उपजिल्हा प्रमुख म्हणून नरेश जोगदंड यांची नियुक्ती करण्यात आली त्या शिवाय पूर्णा तालुक्यातील चुडावा जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी श्रीहरी इंगोले व खुजडा जिल्हा परिषद सर्कल प्रमुखपदी गजानन कुऱ्हे यांची नियुक्ती सर्वांनु मते करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, युवा आघाडी सर्कल प्रमुख सोपान हरकळ, शाखा प्रमुख उद्धव गरुड,सय्यद आरमान, रमेश काळे, सय्यद नाझर,अब्दुल हबीब, शेख बशीर, शेख युनूस, शेख नादान, सय्यद रफिक, वामन गरुड, मंचक कुऱ्हे,संतोष नागठाणे, रमेश जाधव, जगन्नाथ नवघरे,भाऊसाहेब गव्हाणे,नागेश झिंजाडे, दिलीप राजभोस, शेख नयुम, शेख मोईन...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या