💥रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्याची ग्रामस्थांनी केली मागणी💥
पूर्णा (दि.०२ जुन २०२२) - पुर्णा ते हायतनगर मार्गावरील रस्त्याचे काम संबंधित कामाचे गुत्तेदार हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करीत असून नियमाप्रमाणे संबंधित कामा संदर्भात काम कोणत्या फंडातून करण्यात येत आहे,कामाची किंमत काय,कामाचा कालावधी किती,गुत्तेदार कोण या संदर्भात बोर्ड लावणे आवश्यक असतांना संबंधित गुत्तेदार बोर्ड न लावता निकृष्ट दर्जाचे काम करून शासकीय विकासनिधीचा अपहार करण्याचा प्रयत्न करीत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी व या कामावर देखरेख करणारे अभियंता संबंधित गुत्तेदाराशी हितसंबंध जोपासत निकृष्ट व दर्जाहीन कामाला प्रोत्साहन देत असल्यामुळे या मार्गावरी आडगाव,बरबडी,सुहागन,आह्वई येथील ग्रामस्थांनी तिव्र अंतोष व्यक्त करीत आज गुरूवार दि.०२ जुन २०२२ रोजी भ्रष्ट गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध करीत या रस्त्याचे काम आडवून या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे....
0 टिप्पण्या