💥आझादी का अमृत महोत्सावा निमित "रेल्वे सुरक्षा बला" कडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन...!


💥पुर्णा,नांदेड,मुदखेड या प्रमुख रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान प्रवाशांसाठी जलपान एकता दौडसह विविध कार्यक्रम संपन्न💥     


       
पुर्णा (दि.२८ जुन २०२२) - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


पुर्णा नांदेड मुदखेड. या प्रमुख रेल्वे स्थानकावर स्वच्छता  अभियान.प्रवाशांसाठी जलपान. एकता दौड या सारख्या  उपक्रमासह स्वातंत्र्य  सैनिकांच्या सत्कार सोहळाही पार पडला माजी.स्वातंत्र्य  सैनिक  दिवंगत लक्ष्मणराव किशनराव पाटील यांच्या  सुविध पत्नी सिमा लक्ष्मणराव पाटील यांचा शाल व श्रीफळ व बोधचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच  माजी स्वातंत्र्य  सैनिक  सय्यद  आझम याच्या पत्नी जकीरा बेगम यानाही गौरविण्यात आले आहे. तसेच आनाथ आश्रमातील आनाथाना फळ वाटप करण्यात आले.या वेळी रेल्वे  सुरक्षाबलाचे सहाय्यक  आयुक्त एम. चेचय्या.विभागीय निरिक्षक श्रीराम मीना. निरिक्षकविनोदकुमार मीना. स्टोअर मास्टर  पी.हिरालाल यांच्यासह अन्य कर्मचारी  उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या