💥राज्यातील ९ विभागात कोकण अव्वल ठरले तर पुन्हा एकदा मुलींनीच निकालात बाजी मारली💥
✍️ मोहन चौकेकर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यात राज्याचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. पुन्हा एकदा कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचे प्रमाण ९७.२१ टक्के इतके आहे. रिपिटर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५३.०२ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९५ टक्क्यांहून जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
राज्यातील ९ विभागात कोकण विभागाने बाजी मारली, तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. अमरावती विभागाचा निकाल ९६ टक्क्यांहून जास्त असून त्याखालोखाल नागपूर विभागाचा क्रमांक लागतो. नागपूर विभागात ९६.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९५.०७ टक्के, पुणे विभागाचा निकाल ९३.६१ टक्के तर मुंबई विभागाचा निकाल ९०.९१ टक्के इतका लागला.
💥विभागनिहाय टक्केवारी :-
पुणे: 93.61%
नागपुर: 96.52%
औरंगाबाद: 94.97%
मुंबई: 90.91%
कोल्हापूर: 95.07%
अमरावती: 96.34 %
नाशिक: 95.03%
लातूर: 95.25%
कोकण: 97.21%
90 हून जास्त टक्के मिळवणारे १० हजार गुणवंत
राज्यात एकूण १० हजार १४७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक मुंबई विभागात २७६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर पुणे १७००, कोल्हापूर ५९३, अमरावती १७८३, नाशिक ६१२, लातूर ५६३, कोकण १३८ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या