💥पुर्णेतील रेल्वे उड्डान पुलाच्या निकृष्ट बांधकामावर एमआरआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी चालवला हातोडा....!


💥१०० कोटी रुपयांच्या कामाला जवळपास तिन वर्षाचा कालावधी : अद्यापही काम अपुर्ण व निकृष्ट दर्जाचे💥 

पुर्णा : पुर्णा-नांदेड मार्गावरील पुर्णा-हिंगोली/पुर्णा-नांदेड रेल्वे गेटावरून होणाऱ्या रेल्वे उड्डान पुलाच्या बांधकामाला मागील तिन वर्षापूर्वी दि.२७ ऑगस्ट २०१९ यावर्षी सुरूवात झाली सदरील उड्डाण पुलाच्या बांधकामाचा निधी त्यावेळी ९९ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपये इतका मंजूर झाला होता जवळपास १०० कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या या उड्डान पुलाची लाईफ तब्बल १०० वर्षे इतकी ठरवण्यात आली होती या पुलाच्या बांधकामाचे टेंन्डर नामांकीत गुत्तेदार एम/एस डिसीएस पि.व्ही.राव यांना देण्यात आले यावेळी या उड्डान पुलाच्या बांधकामाचे प्रोजेक्ट मेनेजर म्हणून संबंधित कंपनीकडून अनमोल उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी संबंधित प्रोजेक्ट मेनेजर उपाध्याय यांनी व त्यांच्या नंतर त्यांच्या जागेवर आलेले प्रोजेक्ट मेनेजर व्यंकट रेड्डी यांनी सदरील उड्डान पुलाचे बांधकाम इस्टीमेट प्रमाणे नकरता बोगस मनमानी पध्दतीने करण्यास सुरूवात तर केलीच या शिवाय बांधकामा संदर्भात माहिती घेण्यास आलेल्या स्थानिक पत्रकारांना देखील अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यास सुरूवात केली त्यामुळे सदरील उड्डाण पुलाच्या निकृष्ट व दर्जाहीन कामाचे पित्तळ हळुवारपणे उघडकीस यायला सुरुवात झाली.


एमआरआयडीसी मार्फत जवळपास १०० कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या या रेल्वे उड्डान पुलाचे बांधकाम करतेवेळी इस्टीमेट प्रमाणे क्रसॲड अर्थात दगडापासूल तयार केलेली वाळू,२० एमएम मेटल,१० एम एम मेटसह सह नामांकीत कंपनीचे सिमेंट/स्टिल (गजाळी) वापरून मिक्स डिझाईन अंतर्गत बांधकाम करणे आवश्यक असतांना या कामात संबंधितांनी स्टोन क्रेशर मशीन वरील डस्टचा व निकृष्ट अश्या माती मिश्रीत रेतीचा वापर केला कारण क्रसॲड अर्थात दगडापासून रेती बनवण्याचा प्लँट पुर्णा शहरासह जवळपास चाळीस किलोमीटर अंतर्गत कुठेही नाही अश्या पध्दतीने निकृष्ट व चुकीच्या पध्दतीने या रेल्वे उड्डान पुलाचे बांधकाम होत असतांना याकडे एमआरआयडीसीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या कामाचा दर्जा घसरला परिणामी एमआरआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व क्वॉलिटी कंट्रोलच्या अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन सखोल चौकशीअंती सदरील निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे निष्पन्न झाल्याने दि.१६ जुन २०२२ रोजी या उड्डान पुलाच्या बांधकामातील काही पिल्लर पाडण्यास सुरूवात केली. 


💥रेल्वे उड्डान पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यास भविष्यात फार मोठा धोका होणार असल्यामुळे पत्रकारांनी उठवला आवाज :-


पूर्णा-नांदेड राज्य मार्गावरील हिंगोली/नांदेड रेल्वे गेटावरून जाणाऱ्या व जवळपास १०० कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या या रेल्वे उड्डान पुलाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे भविष्यात फार मोठी जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच या विरोधात आवाज उठवायला हवा अशी निर्मळ भावना मनात ठेवून या विरोधात सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत शेवटी हा गंभीर प्रश्न तडीस लावण्याचे काम मुर्ती लहाण पण 'किर्ती महान' म्हणून सर्वश्रूत असलेल्या महाबोधी न्यूज चॅनलचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख प्रदिप ननावरे यांनी केले असे म्हणने चुकीचे ठरणार नाही कारण अन्य पत्रकारांचे देखील या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याचे काम प्रदिप नन्नवरे यांनीच केले काही यानंतर काहींनी दिवाळीला जाहिरात न देण्याचा तर काहींनी आलेल्या संधीचे सोने करीत प्रकरणाचा फायदा घेण्याचे देखील काम केले तर काहींनी प्रदिप नन्नवरे यांच्या निर्मळ हेतूचा फायदा घेत स्वतःचे उक्कळ पांढरे करुन घेण्याचा देखील प्रयत्न केला तर काहींनी प्रोजेक्ट मेनेजर व्यंकट रेड्डीने दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा सुड देखील उगवला काही असो शेवटी निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडण्यात आल्यामुळे भविष्यातील धोका टळला एवढे मात्र निश्चितच.


💥नामांकीत गुत्तेदार एम/एस डिसीएस पि.व्ही.राव यांनी घेतली महत्वाची भुमिका :-

तब्बल ९९ कोटी ६६ लाख ३५ हजार ७५७ रुपयांच्या अंदाजपत्रकातून होणाऱ्या या उड्डान पुलाच्या कामात लँन्ड ॲक्वॉजेशन अर्थात जमीन अधिग्रहन,उड्डाण पुलांतर्गन रस्ते/नाल्यांसह दोन्ही बाजूकडील स्ट्रिट लाईट आदींचा समावेश असून या कामा संदर्भात अनेक तक्रारी व प्रसिध्दी माध्यमांतून प्रसिध्द झालेल्या बातम्या नंतर एमआरआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व क्वॉलिटी कंट्रोलच्या अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन सखोल चौकशीअंती सदरील उड्डाण पुलाच्या पिल्लरांचे बरेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे घोषित केले त्यामुळे गुत्तेदार एम/एस डिसीएस पि.व्ही.राव यांनी तब्बल १२ कोटी रुपयांचा निधी बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी अमानत रक्कम म्हणून एमआरआयडीसीकडे सुपूर्द केल्याचे समजते...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या