💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील ग्रामपंचायतकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.....!


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंबाजी पौळ हे होते💥

ताडकळस  /  प्रतिनिधी 

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या माखणी येथील ग्रामपंचायत तर्फे माखणी ग्रामपंचायतचे सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव हरिभाऊ अवरगंड यांनी दि.21 जून 2022 वार मंगळवार रोजी  ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा योग साधून या वर्षी इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व  पहिल्या व दुसऱ्या  क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सन्मान चिन्ह देऊन सत्कार ग्रामपंचायत कार्यालय माखणी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणी यांच्या सौजन्याने ठेवण्यात आला होता.


या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लिंबाजी पौळ हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जोशी  यांनी केले. इयत्ता 10 मध्ये प्रथम क्रमांक 1) ऋतुजा रामेश्वर आवरगंड व द्वितीय क्रमांक 2)विद्या विष्णू आवरगंड यांना सन्मान चिन्ह,रजिस्टर व पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे इयत्ता 12 वी मध्ये प्रथम क्रमांक 1)शिवानी जनार्धन आवरगंड व द्वितीय क्रमांक 2) निकीता तुकाराम आवरगंड या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान  सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सोसायटीचे चेअरमन व अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विद्या आवरगंड, ऋतुजा आवरगंड व नंदिनी भुजबळ यांनी आपल्या यशात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणीचा खुप मोठा वाटा असल्याचे नमूद केले. पालकामधून सत्काराला उत्तर देताना प्रगतीशील शेतकरी तथा पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी पवार सर, महाजन सर व इतर शिक्षकांनी आपल्या वेळोवेळी मोलाचे  मार्गदर्शन व खुप चांगल्याप्रकारे अध्यापन केल्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे नमूद केले. महाजन सर यांनी गुणवंत विद्यार्थी पालकांना सखोल मार्गदर्शन केले.गावक-यातर्फे  वसंत नाना यांनी जिल्हा परिषद शाळेचे महत्व विषद केले.या कार्यक्रमाला गावकरी ,गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन पवार सर , तर आभार प्रदर्शन राजकुमार ढगे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक सुरज पौळ,शेळके सर,.झटे मँडम व ग्रामपंचायत सेवक श्री.देविदास पल्लमपल्ली, मुजांजी आवरगंड,अंगद आवरगंड, विष्णू आवरगंड, अनुरथ आवरगंड, सचिन आवरगंड, दिपक आवरगंड, शिवाजी आवरगंड यानी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या