💥पुर्णेत मुस्लीम बांधवांनी केला भाजपा महिला राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्माचा तिव्र शब्दात निषेध...!


💥नुपूर शर्मा यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाहीची केली मागणी💥

पुर्णा (दि.१० जुन २०२२) : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी  दि.२०मे २०२२ रोजी टाईम्सनाऊ वरील लाईव्ह टिव्ही चर्चा सत्रात मुस्लीम धर्माचे पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषधार्थ आज शुक्रवार दि.१० जुन २०२२ रोजी उलेमा इकराम/आयमा इकरामच्या वतीने मुस्लीम समाजातील संतप्त नागरीकांनी दुपारच्या नमाज नंतर लोकशाही पध्दतीत शांततेत शिस्तबध्द पध्दतीने निषेध मोर्चा काढून आंबेडकर चौक परिसरात उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

         यावेळी जामा मस्जीदचे सन्माननीय पेशइमाम शमीम रिझवी साहब यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम बांधवांनी नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलो व पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांना निवेदन देऊन या निवेदनात मुस्लीम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भाजपाच्या राष्ट्रीय महिला प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्यावर भादवी.२९५,२९५ (अ),२९८,१५३ (अ) व १५४ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या निवेदनावर शेख सरान बागवान,अली अन्सारी,शेख अक्रम,शेख शफी,शेख इलियास दादामियाँ,शेख इरफान,अली हसन आदींसह अनेक मुस्लीम बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या