💥पुर्णा-धनगर टाकळी रस्त्याचा दोन्ही साईडने काठ ढासळल्याचे हा अरुंद रस्ता देत आहे धोक्याचे संकेत....!


✍🏻रामा पारवे ; पुर्णा तालुका ग्रामीण

💥सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता💥

 पूर्णा (दि.१९ जुन २०२२) - पुर्णा तालुक्यातील पुर्णा-धनगर टाकळी रस्त्यावरील धनगर टाकळी गावा पासून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर मागील एक वर्षापासून रस्त्याच्या काठासह रस्त्याचा काही भाग दोन्ही बाजूंनी ढासळल्यामुळे सदरील रस्ता अत्यंत अरूंद झाल्याने कॅनॉलच्या अत्यंत लगत असलेला पॉईंट वेळोवेळी अपघाताचे संकेत देत असतांना या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली असून या रस्त्यावरून चार चाकी/दुचाकी वाहन सुध्दा घेऊन जाणे धोक्याचे झाले आहे या मार्गावर रात्री-बेरात्री अपघात होण्याची दाट शक्यता आहे.हि समस्या जवळ पास एका वर्षापासून तयार झाली असल्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याला सुरूवात होण्या अगोदर सदरील रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या