💥स्वच्छता विभागाचे प्रमुख व कर्मचार्यांचे शहरवाशीयांमधुन होत आहे कौतुक💥
(फुलचंद भगत)
वाशिम:-मंगरुळपीर शहराला सर्वांग सुंदर स्वच्छ आणी सुंदर बनवण्यासाठी सतत अग्रेसर असणार्या न.प.च्या स्वच्छता विभागाकडून मान्सुनपुर्व कामेही प्राधान्याने केली जात असुन टीम लिडर राजेश संगत यांच्या नेतृत्वात कर्मचारी अॅक्शन मोडवर आहेत.
मंगरुळपीर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग नेहमी जीकरीने आपले कर्तव्य बजावत असतात.शहराच्या सौदर्यात भर पडावी यासाठी विविध ऊपक्रमही प्राधान्याने राबवल्या जातात.शहराची स्वच्छता बघुन समितीच्या पाहणी अहवालानुसार मंगरुळपीर नगरपरिषदेला स्वच्छतेचा पुरस्कारही मिळालेला आहे.स्वच्छता विभागाचे सर्व कर्मचारी नियमित शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी कटिबध्द होवुन सज्ज असतात.आता मान्सुनपुर्व कामाला वेग आला असुन शहरातील मोठे नाले ऊपसा केली जात आहेत जेणेकरुन कुठेही पाणी अडुन डबके साचु नयेत.मंगरुळपीर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागा मार्फत मान्सीनपुर्व कामावर भर दिल्या जात आहे.शहरातील मोठे नाले सफाई केल्या जात आहेत.वाल्मिक नगर ते रामसिंग वाडी ते चेहेलपुरा तसेच अशोकनगरमधील मोठा नाला ते ठाकुर सर यांच्या शेतापर्यत.पिर वाडीचा परिसर,मशुभाई यांच्या घराजवळुन ते नदिपर्यत तसेच शहरातील आवश्यक त्या ठिकाणी जेसिबीव्दारे मोठ्या नाल्याचे खोदकामही केल्या जात आहे.मंगरुळपीर शहरातील संपुर्ण सांडपाण्याच्या ज्या नाल्या आहेत त्यांचीही सफाई केल्या जात आहे.जिथे कुणी जावूही शकत नाहीत तीथे माञ शर्थीचे प्रयत्न करुन स्वच्छताविभागाचे कर्मचारी स्वच्छता करतात.मंगरुळपीर शहराच्या लोकसंख्या प्रमाणानूसार आवश्यक तेवढी कर्मचारी संख्या नसुनही आहे त्या कर्मचार्यांना सोबत घेवून स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे निरिक्षक राजेश संगत हे चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावत असल्याने शहरवाशीयांमधुन टीमचे कौतुक होत आहे.नागरीकांनीही आपल्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासंदर्भातील आवश्यक त्या समस्या सांगाव्यात त्या वेळेत पुर्ण करण्यात येइल असा विश्वास यावेळी राजेश संगत यांनी व्यक्त केला आहे.न.प.प्रशासनासोबतच शहरवाशीयांनीही जबाबदारीने आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे राहिल यासाठी सहकार्य करावे असेही सांगण्यात आले.
प्रतिनीधी :- फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या