💥कोविड रुग्णांकडून घेतलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश....!


💥शुल्क तपासणी व अंमलबजावणीसाठी 10 पथके गठीत💥

फुलचंद भगत

वाशिम : कोविड बाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी व रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबतची अंमलबजावणी व तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 10 पथके गठीत करण्यात आली आहे. काही रुग्णालयांनी बाधित रुग्णांचे उपचाराचे अतिरिक्त शुल्क आकारल्याची पथकाने लोकांची तपासणी केली असता लक्षात आली. त्याबाबतचा अहवाल पथकाने जिल्हाधिकारी यांना सादर केला. 

वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काढलेल्या आदेशाद्वारे रुग्णांकडून आकारलेले अतिरिक्त शुल्क संबंधित रुग्णांना परत करण्याबाबत कळविले आहे. डॉक्टर घुगे यांचे वरद हॉस्पिटल यांनी 15 एप्रिल ते 5मे 2021 याकालावधीत उपचार घेणाऱ्या चार बाधित रुग्णांकडून 26,410 रुपये, वाशिम कोविड हॉस्पिटल (सिक्युरा हॉस्पीटल) यांनी 10 एप्रिल 2021 ते 11 जून 2021 या कालावधीत 63 रुग्णांच्या उपचाराचे 2 लाख 33 हजार 800 रुपये आणि बिबेकर हॉस्पिटल 7 एप्रिल 2021 ते 30 मे 2021 या कालावधीत 5 हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर रुग्णांचे आकारलेले अतिरिक्त शुल्क त्यांच्या बँक खात्यात 1 जुलै 2022 पर्यंत जमा करण्याचे आदेश संबंधित रुग्णालयांना दिले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या