💥मंगरुळपीर तालुक्यात सर्वञ शांतता व सुव्यवस्था नांदेल यासाठी सर्वांनी सजग राहुन सामाजीक सलोख्याचे पालन करा...!


💥ठाणेदार सुनिल हूड यांनी केले नागरिकांना आवाहन💥

फुलचंद भगत

वाशिम :-मंगरुळपीर शहरासह तालुक्यात शांतता व सुव्यवस्था नांदेल यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे तसेच सामाजीक सलोख्याने व एकजुटीने सर्वधर्मीयांनी गुण्यागोविदांने नादांवे असे आवाहन दि.१३ रोजी पो.स्टे.मंगरुळपीर येथे पार पडलेल्या पोलीस अधिक्षक आणी पोलीस ऊपविभागिय अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार सुनिल हुड यांनी आपले मत व्यक्त केले.


           सध्या महाराष्टसह देशात राजकीय वातावरण ढवळुन निघत आहेत.विविध राजकारण्यांच्या भाष्यामुळे ताणतणाव निर्माण होत आहे.सोशल मिडियावर भडकावू पोष्ट टाकुन काहिजन सामाजीक शांतता भंगवण्याचे छडयंञ करीत आहेत.यासाठी सर्वांनी सजग राहुन आपल्या मंगरुळपीर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याची काळजी घेवुन कुणीही अफवेला बळी पडु नये.सामाजिक एक्याने जीवन जगुन एकमेकांच्या सुखदुःखात सामिल होवुन राष्टीय एकात्मतेचे ऊदाहरण निर्माण करण्याचे आवाहण ठाणेदार सुनिल हुड यांनी केले.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता शहरातील प्रत्येक धर्माच्या धार्मिक संस्थानी मंगरुळपीर पोलिस स्टेशनकडून रितसर परवानगी घेऊनच, कायद्याचे पालन करीत अजान, काकड आरती, हरिपाठ आदी धार्मीक कार्यक्रम प्रसंगी भोंग्यांचा वापर करावा . तसेच रात्री १०:०० ते सकाळी ०६:०० वाजेपर्यंत शासन निर्देशाप्रमाणे लाऊडस्पिकरचा वापर करता येणार नाही तेव्हा या वेळेत शांतता ठेवावी .ज्या संस्थाची धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी नसेल त्यांनी नोंदणी करून भोंग्या करीता रितसर परवाना घ्यावा अन्यथा लाऊडस्पिकर जप्त होण्याची कार्यवाही होऊ शकते . तसेच आपल्या शहरातील शांतता, सुव्यवस्था व सर्वधर्मिय एकात्मता टिकविण्याकरीता बांधील राहून पोलीस यंत्रणेना सहकार्य करण्याचे आवाहन कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार यांनी शांतता कमेटी तथा पत्रकाराच्या सभेमध्ये केले . याबाबत अधिक वृत्त असे की,अत्यंत सलोख्याच्या वातावरणात पोलिस अधिक्षक आणी पोलीस ऊपविभागीय अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यांच्या अध्यक्षतेखाली मंगरुळपीर पोलिस स्टेशनमध्ये सभा घेण्यात आली . यावेळी सामाजीक कार्यकर्ते,विविध पक्षाचे पदाधिकारी,नगरसेवक,महिला आदीसह पञकार आणी मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या .

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या