💥श्री च्या पालखीचे बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असलेल्या औंढा नागनाथ नगरीत मानकरी पाटील परिवारा तर्फे जंगी स्वागत....!


💥श्रीच्या पालखीतील भाविक भक्त,भजनी मंडळींसह सेवेकरी मंडळींना महाप्रसादाचे वाटप💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

 औंढा नागनाथ ; येथे काल शनिवार दिनांक 18 रोजी विदर्भाची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असलेल्या आठवी ज्योतिर्लिंग श्री औंढा नागनाथ नगरीत आगमन झाले या पालखीच्या सोहळ्याचा मान नेहमीप्रमाणेच पाटील घराण्यांना मिळालेला असून श्री नंदू पाटील प्रतिभा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे अद्यावत पूजा करून स्वागत करण्यात आले.


       गेल्या 48 ते 50 वर्षापासून श्री शेत्र औंढा नागनाथ नगरीत श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे विदर्भातून मराठवाड्यात आगमन झाले नंतर पानकनेरगाव सेनगाव नरसी नामदेव दिग्रस कराळे यामार्गे मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या नव्हे तर हिंदुस्तान मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथ नगरीत आज दिनांक 18 जून रोजी पालखीचे स्वागत औंढा नागनाथ येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये करण्यात आले तसेच सभामंडप क्रमांक एक मध्ये श्री नंदू पाटील व त्यांच्या परिवारातर्फे समस्त पालखी वासी व उपस्थित सर्वांना भव्य महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात यावेळी कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे जिल्हा परिषद चे माजी सभापती बाबा नाईक ,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन देशमुख , दिलीपराव देसाई , शामराव जगताप , औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष रमेश जाधव, चिखली सरनाईक येथील प्रतिष्ठित रमेश पुंड, रुक्मिणीबाई पुंड, रुद्रामनी पाटील, कृष्णा पाटील, विवेक वानखेडे आदी सह भाविकांनी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले.

श्री संत गजानन महाराज यांची पालखी दि 6 जुन रोजी शेगाव येथून प्रस्थान झालेली असून श्रीच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारी करती भजनी मंडळी दिंडी आश्वसह जवळपास सातशे-आठसे वारकऱ्यासह हि दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली आहे .

आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून पालखीचे प्रस्थान झाले आहे त्यातच येत असलेल्या श्री गजानन महाराज यांची पालखी तब्बल  कोरोना नंतर दोन वर्षा भक्तिमय वातावरणात पाहायला मिळत आहे महाराष्ट्रतून ठीकठीकनावरून सोहळे चालू झाले आहेत दि  6 जुन रोजी गजानन महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले आहे 

आज दि.18 जुन रोजी श्री शेत्र औंढा नागनाथ नगरीत आगमन श्रीच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी भक्त निवास क्रमांक एक मध्ये महाप्रसादाचे मानकरी नंदू पाटील व सौ प्रतिभा पाटील यांच्या हस्ते महाप्रसाद सोडून श्री च्या पालखी चे दर्शन घेण्यात आले यावेळी औंढानागनाथ संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णा कानमुळे, तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची उपस्थिती होती.श्री च्या पालखीच्या बंदोबस्त साठी औंढा नागनाथ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, ए. पी.आय. अनिल दांडगे, स.पो.नि. मुंजाजी वाघमारे पाटील ,जमादार अफसर पठाण, रवी इंगोले, इम्रान पठाण यांच्यासह पोलिसांनी चोख  बंदोबस्त ठेवण्यात आला होता औंढा नागनाथ कडून हि दिंडी जवळा बाजाराकडे प्रस्थान झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या