💥शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्याचा शेळी पालनकडे कल...!


💥हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने दिला शेळी पालनावर भर💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली - सध्या निसर्गाच्या लहरीपनामुळे शेतात कधी अतिवृष्टीमुळे पिके जातात तर कधि कोरडा दुष्काळ असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मागें असतात मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत आजेगाव येथील तरुण युवा शेतकरी पत्रकार विकास दळवी  यांनी त्यांच्या शेतात शेळी पालन केले आहे. त्यांनी २० शेळ्यापासून सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक करून शेळी पालन उभें केले,आत्ता त्यांच्या कडे एकुन लहान मोठ्या अश्या ३६ शेळ्या आहेत. त्या शेळ्या साठी त्यांनी शेतात शेड देखिल उभारले आहे ? आणि पूर्ण शेडला त्यांनी जाळी मारून व्यवस्थितपणे चारा पाण्याची देखिल व्यवस्था केली आहे.

 त्यांनी त्यांच्या शेतात शेळ्यासाठी घास पण टाकली आहे.पत्रकार दळवी यांना यासाठी एकुन खर्च सुमारे ७ लाख रुपये आला आहे .विकास दळवी हें महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन चे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधा आहेत. त्यांनी आपल्या चैनलच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना तसेच गावातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम देखिल ते करतात मात्र यशस्वी पत्रकार होण्यासोबतच आत्ता त्यांनी यशस्वीपणे शेळी पालन देखिल करत आहे. पत्रकारीतेत सध्याच्या युगात पत्रकार यांना काही मानधन मिळत नाही त्यामुळे पत्रकारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पत्रकारांना मानधन चालू करण्यात यावे प्रशासनाच्या शेळी पालन मेंढी पालन अनेक योजना आहेत मात्र विकास दळवी यांनी प्रशासनच्या कोणत्याही योजना लाभ अद्यापही त्यांनी घेतला नाही सरकारी काम आणि १२ माहिने थांब अशी परिस्थिती असल्याने त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नाही ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांनी निव्वळ शेतीच्या भरुष्यावर न राहता शेती पूरक जोड धंदा किंवा शेळी पालन कीं गाई म्हशी अश्या जोड धंद्यात भर द्यावा असे आव्हान पत्रकार विकास दळवी यांनी केले आहे

* प्रतिक्रिया :-


मी माझ्या शेतात सध्या शेळी पालन चालू केले आहे मी या शेळी पालनाची सुरुवात २० शेळ्या पासून केली आहे त्या शेळ्या घेण्यासाठी मला अडीच लाख रुपये खर्च आला होता आणि शेड जाळी शेळ्याना चारा पाण्याची देखिल व्यवस्था केली आहे त्याला एकुन सात लाख रुपये खर्च आला आहे मी स्वतः या शेळ्या वर लक्ष देतो आणि रोज चारा पाण्याची व्यवस्था देखिल मीच करतो शेती ला काहितरी जोड धंदा म्हूनण मी हें शेळी पालन चालू केले आहे मी या पुर्वी महाराष्ट्रातील एबीपी माझा या वृत्तवाहिनीला काम करत होतो मात्र काही कारणास्तव मी ते काम सोडले आणि आत्ता मी महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन हिंगोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो तसेंच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेजिल्हा अध्यक्ष पद देखिल माझ्या कडे आहे मी जो आत्ता शेळी पालन व्यवसाय चालू केला आहे काय शेळ्या ...काय करडु ..काय हिरवळ ..काय व्यवस्था ...सगळ कस ओके मधे हाय बघा असा टोला देखिल त्यांनी लगावला आहे 

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.परंतु ग्रामीण पत्रकारांना शासनमान्य कुठलेही मानधन किंवा वेतन नाही.अशा परिस्थितीत पत्रकारांसमोर मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असतं. सोबतच धावपळीच्या काळात इतरांना प्रसिद्धी देण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्य व कुटुंबियाच्या सनी कडे लक्ष देता येत नाही. परिस्थितीत पत्रकारिता करत असताना आर्थिक बाजूने देखील पत्रकार सक्षम असले पाहिजे यासाठी जोड उद्योग व्यवसाय करण्याचा सल्ला विकास दळवी यांनी दिला आहे.....





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या