💥मारवाडी युवा मंचचे प्रदेश पदाधिकारी मनोज अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले नियुक्तीपत्र💥
फुलचंद भगत
वाशिम: सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या मारवाडी युवा मंच शेलूबाजारच्या नविन कार्यकारिणीची गठण करण्यात आले असून अध्यक्षपदी युवा समाजसेवी मोहित कर्नावट यांची निवड करण्यात आली आहे.
आज रविवार 19 जून रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात मारवाडी युवा मंचचे प्रदेश पदाधिकारी मनोज अग्रवाल समवेत सर्व सदस्यांनी मोहित कर्नावट यांना नियुक्तीपत्र देवून त्यांच्या जबाबदारी सोपविली आहे. गत अनेक वर्षापासून संपूर्ण विदर्भात शेलूबाजार मारवाडी युवा मंचने आपल्या सामाजिक कार्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक करून विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. संघटनेने आपल्या नेतृत्वावर जो विश्वास व्यक्त केला, त्याला तडा जावू देणार नाही, आपल्या कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प नवनिर्वाचीत अध्यक्ष मोहित कर्नावट यांनी व्यक्त केला. शेलूबाजार कार्यकारिणीत अध्यक्ष मोहित कर्नावट, सचिव शुभम बाहेती, कोषाध्यक्ष श्याम अपूर्वा, यांची निवड करण्यात आली. नियुक्ती पत्र देतांना देविचंद तोडरवाल, प्रविण अग्रवाल, मनोज अग्रवाल, अनिल गोती , रिकब कोठारी, राजेश भांगडीया, अजय अग्रवाल, पवन बजाज, मिठूलाल मालपाणी, चेतन कर्नावट, सुशिल अपूर्वा, रामा राऊत, गणेश राऊत आदिंची उपस्थिती होती. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे...
0 टिप्पण्या