💥कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथे शाळेतील विद्यार्थींनीन सोबत मुख्याध्यापकाने केले अस्लील चाळे...!


💥विद्यार्थींनींन सोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला गावकऱ्यांनी दिला चोप💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या विद्यार्थिनिसोबत असलेल चाळे केल्याची खळबळजनक घटना घडली असून गावकऱ्यांनी आज या मुख्याध्यापकास चांगलाच चोप दिला आहे.

सदर मुख्याध्यापकाचे नाव भगवान अवचार असून तो गावातील पाच ते सहा मुलींना शाळेमध्ये बोलावून त्यांच्यासोबत अस्लील चाळे करून घरी न सांगण्याची मुलींना धमकी देत होता तर गावकऱ्यांनी आज दिनांक 10 जून रोजी या मुख्याध्यापकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केली आहे व तसेच या मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करून निलंबन करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत असून आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये सदर मुख्याध्यापकांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या