💥नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी तहसीलदार मंगरुळपीर मार्फत निवेदन सादर....!


💥कौमी तंजीमचे जिल्हाध्यक्ष मुख्तार खान पटेल यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन💥 

फुलचंद भगत

वाशिम :- मुस्लिम संघटनांनी मंगरूळपीर तहसीलदार आणि एसडीपीओ यांना निवेदन सादर केले आणि भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. निवेदन द्वारे नुपूर शर्माला अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


             सोमवारी कौमी तंजीमचे जिल्हाध्यक्ष मुख्तार खान पटेल, शहराध्यक्ष सलीम जहागीरदार, माजी नगरसेवक उबेद मिर्झा, राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख इरफान, माजी नगरसेवक लाईक अहमद, टिपू सुलतान सेनेचे शहराध्यक्ष जुबेर अहमद, युनूस खान कोठारीकर आणि मीर काशिफ अली,अ. ग़नी आदी उपस्थित होते. राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे केवळ देशाचेच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांचे मन दुखावले आहे. अशा लोकांवर तातडीने कारवाई करावी. त्याचा निषेध करून कायदा हातात घेणे चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर अशा लोकांना अटक करणे, घरे पाडणे ही प्रक्रिया संविधानाच्या विरोधात असल्याचे सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली, यावेळी अनेक मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या